'यालाच तर म्हणतात खरं प्रेम !' हरली प्रियंका पण रडला अंकित..चाहतेही भावुक Priyanka chaharchoudhary: | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka chahar choudhary
Ankit gupta

Priyanka chaharchoudhary: 'यालाच तर म्हणतात खरं प्रेम !' हरली प्रियंका पण रडला अंकित..चाहतेही भावुक

बिग बॉसचा 16वा सिझन काल संपला आहे. बिग बॉस 16 ची ट्रॉफी जिंकून एमसी स्टॅनने त्याच्या नावावर केली. त्याच्या चाहत्यांच्या जोरावर त्याने शो मध्ये दणदणित विजय मिळवला.

दुसरीकडे एमसी स्टॅनने जरी ट्रॉफी जिंकली असली तरी प्रियांका चहर चौधरीने टॉप तीन मध्ये स्थान मिळवलं. तिचा पराभव झाल्याच्या चर्चाही सर्वत्र रंगत आहेत. या निर्णयामुळे प्रियांकाच्या चाहत्यांसोबतच सलमान खानलाही चांगलाच धक्का बसला आहे. कारण बिग बॉसच्या या सिझनची विजेती म्हणून सर्व तिच्याकडे पाहत होते.

प्रियंकाने बाहेर आल्यावर ती इथ प्रर्यंत पोहचली यातच ती खुप आंनदी आहे असं तिने सांगितलं. त्याचबरोबर स्टॅन जिंकल्याचा आंनदही व्यक्त केला. ती बाहेर आल्यावर तिच्या चेहऱ्यावर हरल्याचे भाव मुळीच नव्हते. ती खुप समाधानी होती. मात्र ती शोमधुन बाहेर पडल्यांची बातमी ऐकताच अंकित गुप्ता मात्र खुप भावुक झाला. तो त्याचे अश्रू थांबवु शकला नाही.

प्रियंका चहर चौधरी घराबाहेर पडल्याची बातमी येताच अंकित गुप्ता हे ऐकून स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अशातच प्रियांकाच्या पराभवाचा धक्का अंकित गुप्ताला सहन झाला नाही. तो म्हणाला की, प्रियांकाने तिचा खेळ अतिशय दमदारपणे खेळला आहे. इतकंच नाही तर हा गेम फक्त प्रियंका चहर चौधरीच जिंकेल असं अंकित गुप्ता गृहीत धरत होता. पण प्रियांकाच्या चाहत्यांप्रमाणेच अंकित गुप्तालाही धक्का बसला आहे.

प्रियंका आणि अंकित गुप्ताचं नातं सर्वांनीच पाहिलं होतं. ती त्याच्यासोबतच शोमध्ये आली होती. पण आज बिग बॉस 16 च्या फिनालेमध्ये प्रियांका चहर चौधरी तिसऱ्या क्रमांकावर आल्यानंतर प्रियंकाच्या चाहत्यांप्रमाणेच तोही खुप दु:खी झाला