लॉकडाऊन दरम्यान प्रियंका-निक करत आहेत सूर्यप्रकाशात वर्कआऊट..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 मार्च 2020

अभिनेत्री प्रियंका चोप्रा पती निक जोनास सोबत वर्कआऊट करताना दिसली..निकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर केला होता..

मुंबई- कोरोना व्हायरमुळे जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे..यादरम्यान शूटींग बंद असल्याने सेलिब्रिटी घरीत वेळ घालवताना पाहायला मिळत आहेत...सेलिब्रिंटीना त्यांच्या करिअरसाठी सगळ्यात जास्त महत्वाचा असतो तो व्यायाम..सध्या घरातंच सेलिब्रिटी व्यायाम करताना दिसत आहेत..

मोठी बातमी- कोरोनामुळे मुंबईचा दूध पुरवठा होऊ शकतो बंद..

अभिनेत्री प्रियंका चोप्रा पती निक जोनास सोबत अशाचप्रकारे वर्कआऊट करताना दिसली..निकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर केला होता..या व्हिडिओमध्ये दोघे मोकळ्या हवेत उन्हात जीमसूट घालून वर्कआऊट करताना दिसून आले..

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Priyanka working out With Nick Jonas #PriyankaChopra #NickJonas #Nikyanka

A post shared by Bollywood Ki Baten (@bollywoodkibaten) on

सिनेमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रियंका शेवटची 'द स्काय इज पिंक'मध्ये दिसून आली होती..शोनाली बोसने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात तिच्यासोबत जायरा वसीम आणि फरहान अख्तर दिसून आले होते..प्रियंका लवकरंच आगामी 'द व्हाईट टायगर' या सिनेमात दिसेल..नेटफ्लिक्सच्या या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल..हा सिनेमा अरविंद अडिगा यांच्या 'द व्हाईट टायगर' या बुकर प्राईज विजेता कादंबरीवर आधारित आहे..अडिगा यांच्या कादंबरिला २००८ मध्ये बुकर प्राईज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं..मुकुल देओरासोबत नेटफ्लिक्सद्वारे या सिनेमाची निर्मिती केली जाणार आहे..

47 New Bollywood Movie Release That Will Set the Bar for ...

कोरोनामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे..काल २७ मार्च रोजी एका दिवसात मुंबई आणि आसपासच्या भागातून ९ कोरोना रुग्ण समोर आले आहेत..हा वाढता आकडा मुंबईची चिंता वाढवणारा आहे..या ९ जणांमध्ये ६ पुरुष तर ३ महिला आहेत..यातील ३ रुग्णांना मुंबईतील भाभा तर बाकी सहा रुग्णांना कस्तुरबामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे..सगळ्यात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात असल्याने विशेष काळजी घेणं आवश्यक आहे..

 priyanka chopra and nick jonas workout under sun amid coronavirus  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: priyanka chopra and nick jonas workout under sun amid coronavirus