प्रियांका झाली ‘युनिसेफ’ची सदिच्छादूत

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

न्यूयॉर्क : बॉलिवूडमध्येच नाही तर अभिनेत्री प्रियांका चोप्राने आंतरराष्ट्रीय स्तरावरही ठसा उमटवला आहे. आता तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. ‘युनिसेफ’ची ग्लोबल गुडविल अॅम्बेसेडर अर्थात जागतिक सदिच्छादूत म्हणून प्रियांकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आणि बारा वर्षीय ब्रिटीश अभिनेत्री मिली बॉबी ब्राऊन यांनी प्रियांकाच्या नियुक्तीची घोषणा केली. त्यावेळी संयुक्त राष्ट्रसंघांचे राजनैतिक अधिकारी, सदिच्छादूत आणि काही लहान मुले उपस्थित होती. 

गेले बारा वर्ष मी युनिसेफ बरोबर काम करत आहे. त्यावेळी अनेक अभ्यास सहलींना मी गेले होते. तेथे अनेक लहानमुलांना भेटताना त्यांचे विविध प्रश्न समोर आल्याचे प्रियांकाने सांगितले. त्यामुळेच जगभरातील पीडित लहानग्यांचा आवाज व्हा आणि भविष्यातील पिढ्यांसाठी चांगले भविष्य घडवा, असे आवाहन तीने जगभरातील नागरिकांना केले आहे. तसेच प्रत्येक क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे जगभरातील लहानग्यांना हिंसा, पिळवणूक आणि शोषणाचा सामना करावा लागत आहे. या अन्यायाविरोधात एकत्रित लढा देण्याची आवश्यकता असल्याचे मत तीने यावेळी बोलताना व्यक्त केले.

फोटो सौजन्य - प्रियांका चेप्रा ट्विटर अकाऊंटवरुन साभार

Web Title: Priyanka Chopra Appointed UNICEF Global Goodwill Ambassador