Priyanka Chopra: या कारणावरून प्रियांकाने तीन वेळा आत्महत्येचा केला होता प्रयत्न, मॅनेजरने केला होता धक्कादायक खुलासा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

priyanka chopra

Priyanka Chopra: या कारणावरून प्रियांकाने तीन वेळा आत्महत्येचा केला होता प्रयत्न, मॅनेजरने केला होता धक्कादायक खुलासा...

प्रियांका चोप्राला बॉलिवूडमध्ये देसी गर्ल म्हणूनही ओळखले जाते. आज प्रियांकाने तिच्या मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवली आहे. प्रियांका पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत अमेरिकेत आनंदी जीवन जगत आहे.

आज जरी अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी आहे, परंतु एकेकाळी अभिनेत्री तिच्या आयुष्यात इतकी निराश झाली होती की तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. होय, प्रियांकाने तिच्या संघर्षाच्या दिवसांत आत्महत्येचा प्रयत्न केला होता, ज्याचा खुलासा खुद्द प्रियांकाचे माजी व्यवस्थापक प्रकाश जाजू यांनी केला होता.

अनेक वर्षांपूर्वी प्रकाश जाजू यांनी ट्विटरवर अनेक ट्विट केले होते, ज्यात त्यांनी प्रियांकाच्या आत्महत्येच्या प्रयत्नाविषयी सांगितले होते. त्याने लिहिले, "आज खूप स्ट्रॉन्ग दिसत असलेल्या प्रियंकाने यापूर्वी 2-3 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि मी तिला कसेतरी थांबवले होते.

प्रियंका आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड असीम मर्चंटमध्ये खूप भांडण व्हायचे. त्यादरम्यान मध्यरात्री त्रासलेल्या अवस्थेत प्रियंका मला अनेकदा फोन करायची.

त्याने पुढे लिहिले की, "एकदा असीमसोबत भांडण झाल्यावर प्रियंका मुंबईच्या वसई भागात ड्राईव्हसाठी आली आणि तिथे तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रियंका असीमच्या आईच्या खूप जवळ होती.

मात्र 2002 मध्ये असीमच्या आईचे निधन झाल्यानंतर प्रियांकाला वसईतील इमारतीवरून उडी मारून जीवन संपवायचे होते. या घटनेनंतर त्या फ्लॅटच्या खिडक्यांना लोखंडी ग्रील्स बसेपर्यंत प्रियंकाला खुर्चीला बांधून ठेवण्यात आले होते.

प्रियांकाचे तिच्या माजी व्यवस्थापकाशी वाद झाल्याचे सर्वश्रुत आहे. प्रियांकानेही अचानक प्रकाशसोबतचा करार तोडला होता. त्याचवेळी प्रियांकाचे वडील अशोक चोप्रा यांनीही प्रियांकाच्या गोपनीयतेत हस्तक्षेप केल्याप्रकरणी प्रकाश यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यानंतर प्रकाशला 67 रात्र तुरुंगात काढावी लागली.

टॅग्स :priyanka chopra