निकसोबत डिनरला गेलेल्या प्रियांकाला ड्रेसनं दिला दगा

वृत्तसंस्था
बुधवार, 8 जानेवारी 2020

प्रियांका चोप्राला ट्रान्सपरन्ट ड्रेसमुळे Oops Moment सामोरं जावं लागलं. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमधीलही हिट जोडी आहे. पर्सनल लाइफसोबतच हे दोघंही त्यांचं प्रोफेशनल लाइफ सुद्धा व्यवस्थित सांभाळताना दिसतात. या दोघांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

नुकतीच या कपलनं गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये हजेरी लावली. यावेळी ट्रान्सपरन्ट ड्रेसमुळे तिला Oops Moment सामोरं जावं लागलं. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

Priyanka Chopra and Nick Jonas Priyanka Chopra and Nick Jonas

प्रियांका चोप्रानं रविवारी अमेरिकेत पार पडलेल्या 77 व्या गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये हजेरी लावली. हा समारंभ संपल्यानंतर या दोघांनीही आफ्टर पार्टीमध्ये सहभागी होण्याऐवजी कॅलिफोर्नियामध्ये डिनर प्लान केला होता. अवॉर्ड फंक्शनमधून निघाल्यानंतर प्रियांका-निकला फोटोग्राफर्सनी घेरलं. पण यावेळी प्रियांका तिच्या ड्रेसमुळे ऑकवर्ड फिल करताना दिसली. प्रियांकानं घातलेला हा ड्रेस एवढा ट्रान्सपरन्ट होता की फोटोग्राफर्सपासून बचाव करण्यासाठी तिनं आपल्या बॅगची मदत घेतली.

Priyanka Chopra and Nick Jonas

प्रियांकानं यावेळी फोटोग्राफर्सनी चुकीच्या अँगलमधून फोटो काढू नये यासाठी प्रियांकानं आपली बॅग समोर पकडत स्वतःचा बचाव केला. प्रियांकाच्या या बॅगची किंमत जवळपास 5 लाख रुपये असल्याचं बोललं जात आहे. प्रियांकाचे हे फोटो तिच्या इन्स्टग्राम फॅनपेजवरुन शेअर केले गेले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

प्रियंका चोपड़ा, निक जोनस

याशिवाय निकला लिपलॉक किस करतानाचा प्रियांकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2020 सोहळा अमेरिकेतील लॉस एंजिलिस शहरातील बेवर्ली हिल्टन हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी प्रियांका पिंक गाऊनमध्ये दिसली. यासोबत तिनं डायमंड नेकलेस आणि इयरिंग्स घातले होते. तर ब्लॅक ब्लेझर सुटमध्ये खूपच हॅन्डसम दिसत होता. या कार्यक्रमातील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यात प्रियांका निकला लिपलॉक किस करताना दिसत आहे. पण यावेळी प्रियांकाची लिपस्टिक निकच्या ओठांना लागते. हे पाहिल्यावर प्रियांका सर्वांसमोर आपल्या हातानं ती लिपस्टिक पुसताना दिसते.

प्रियांका आणि निकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. तसं पाहायला गेलं तर असं करण्याची निक-प्रियांकाची ही पहिलीच वेळ नाही. पण हा व्हिडीओ खूप खास आहे. याआधीही या दोघांच्या एका फॅनपेजवर न्यू ईयरला लिपलॉक किसचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ एका पार्टीतला असल्याचं बोललं जात आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Love birds #priyankachopra #nickjonas

A post shared by Priyanka Chopra Jonas Fanpage (@priyankachopra.pic) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyanka chopra avoids awkward wardrobe malfunction with 5 lakh rupees bag viral pictures update