'मला काळी मांजर बोलायचे हे लोक,तिथे..',प्रियंकानं दिग्गजांसमोर बॉलीवूडची इज्जतच काढली Priyanka Chopra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Chopra Faced body shaming because of her complexion in bollywood

Priyanka Chopra:'मला काळी मांजर बोलायचे हे लोक,आजही..'; प्रियंकानं दिग्गजांसमोर बॉलीवूडची इज्जतच काढली

Priyanka Chopra: बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आज जिथे पोहोचलीय तिथे पोहोचायला तिला खूप संघर्ष करावा लागला हे वेगळं सांगायला नको. तिला अनेक लोकांची टीका देखील सहन करावी लागली आहे. अगदी काम मिळावं म्हणून तिनं कमी पैशातही एकेकाळी काम केलं आहे. बीबीसी च्या '100 वुमन दिस इयर..' या कार्यक्रमात अभिनेत्रीनं याविषयी मोठा खुलासा केला आहे. तिनं सांगितलं की कधीही अभिनेत्या इतकं मानधन बॉलीवूडमध्ये अभिनेत्रीला देत नाहीत. सिनेमाच्या सेटवर देखील अभिनेत्यांना जास्त चांगली वागणूक मिळते.(Priyanka Chopra Faced body shaming because of her complexion in bollywood)

हेही वाचा: Bollywood: कॉस्मेटिक सर्जरीवर हे काय बोलून गेली जॅकलिन?, व्हायरल व्हिडीओ पाहून भडकले लोक...

प्रियंका चोप्रानं त्या कार्यक्रमात बोलताना पुढे सांगितलं की,''मला बॉलीवूडमध्ये कधीच एखाद्या अभिनेत्याच्या बरोबरीनं समान दर्जा मिळाला नाही. अभिनेत्याला जेवढं मानधन दिलं जात होतं त्याच्या फक्त 10 टक्के मला दिलं जायचं. ही खूपच मोठी तफावत होती. आणि याचमुळे बॉलीवूडमध्ये कितीतरी महिला या सगळ्या गोष्टींसोबत आजही डील करत आहेत. मला माहीत आहे मी आजही जर बॉलीवूडमध्ये एखाद्या हिरोसोबत काम केलं तर माझ्यासोबतही तेच घडेल. माझ्या जनरेशनच्या सगळ्या अभिनेत्रींनी यासंदर्भात आवाज उठवला आहे. पण अद्यापही यात सुधारणा झालेली दिसत नाही.

हेही वाचा- Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

हेही वाचा: Sharad Ponkshe: देशासाठी लढायला निघाल्या होत्या लता मंगेशकर.. सावरकर म्हणाले..

प्रियंका चोप्रानं सेटवर आपल्यासोबत लोक कसे वागायचे याचा देखील खुलासा केला आहे. ती म्हणाली,''मला वाटायचं आपले सीन नसतील तरी सेटवर आपण हजर असायला हवं. आणि तासनतास बसून सीनची वाट पाहणं मला योग्य वाटायचं. पण माझ्या सिनेमाचा हिरो मात्र आधीच सांगायचा,जेव्हा सीन लागतील तेव्हा मी सेटवर दिसेन''. आपण जेव्हा करिअर सुरू केलं तेव्हा बॉडी शेमिंगचा सामना देखील आपल्याला करायला लागला हे देखील प्रियंकानं नमूद केलं.

हेही वाचा: Fraud Case:'सिनेमाच्या शूटिंगसाठी गेला अन्..', नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य विरोधात लखनौमध्ये FIR दाखल

प्रियंकानं मुलाखतीत सांगितलं की,''मला 'काळी मांजर' ,'सावळी' म्हणूनही हिणवायचे. माझा बोलण्याचा अर्थ हा आहे की,भारतात सावळ्या रंगाचा काय अर्थ असेल जिथे जवळपास सगळेच त्या रंगाच्या शेडमध्ये दिसतात. मला वाटायचं,मी जास्त सुंदर नाही. मला खूप मेहनत करावी लागेल. एवढंच नाही मला हे देखील वाटायचं की माझ्या गोऱ्या सहकलाकारांच्या तुलनेत मी जरा जास्त हुशार आहे. पण मग मला सगळं कालांतराने ठीक आहे जे सुरु आहे ते असं वाटायला लागलं होतं....सगळं नॉर्मल बनत गेलं काळानुसार...''