
बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानं आपल्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली. 'मिस वर्ल्ड' असलेल्या प्रियांकाने 'द हिरो-लव स्टोरी ऑफ स्पाय' या चित्रपटातनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. कमी वेळेत प्रियांकानं नाव कमावलं.
बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानं आपल्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली. 'मिस वर्ल्ड' असलेल्या प्रियांकाने 'द हिरो-लव स्टोरी ऑफ स्पाय' या चित्रपटातनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. कमी वेळेत प्रियांकानं नाव कमावलं. प्रियांकाच्या फॅशन, दोस्ताना, कमिने, 7 खून माफ, बर्फी, बाजीराव मस्तानी, मेरी कोम, डॅान या सिनेमांना चाहत्यांची पसंती मिळाली. पण, आता प्रियंका अधून-मधून सिनेमाबरोबरच इतर कारणांनीही चर्चेत असते.
अमेरीकन गायक निक जोनस सोबत प्रियांकाचं लग्न झालं. 12 वर्षांची असताना प्रियांका शिक्षणासाठी अमेरीकेत गेली होती. एका इंटरव्हूमध्ये तिनं सांगितलं की, अमेरिकेत असताना तिला बुलिंग केलं जात होतं. 'मी या गोष्टी खूप पर्सनली घेतल्या होत्या. माझ्यात खूप आक्रोश निर्माण झाला होता मी नि:शब्द झाले होते. मला कोणी बघू नये, असे मला वाटत होते. मी गायब होऊ इच्छीत होते. माझ्यामधील आत्मविश्वास संपला होता. नेहमी मी स्वतःला आत्मविश्वास असलेली मुलगी समजत होते. पण, तेव्हा मी नक्की कोण आहे हे मला समजत नव्हते'. प्रियांकाने आपल्या 'अनफिनिश्ड' या आत्मकथेतही हे सगळं लिहिलंय.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शाळेतील काही मुली 'तिला ब्राउनी आपल्या देशात परत जा आणि ज्या हत्तीवर तू बसून अली आहेस त्याला पण घेऊन जा' असे म्हणत होत्या, असंही प्रियांकानं सांगितलंय. प्रियंकानं तेव्हा स्कूल कौन्सिलरची मदत घेतली. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. 'मी त्या देशाला दोष देत नाही, मला असे वाटते त्या वयाच्या मुली अश्याच बोलतात. आता मी ३५ वर्षांची झाली आहे. मला या गोष्टीची दुसरी बाजू लक्षात आली आहे. तेव्हा मी या गोष्टी खूप पेर्सनली घेतल्या होत्या. त्यामुळे मी अमेरिकेसोबत ब्रेकअप केले. मला या गोष्टीचा आनंद आहे की मी भारतात परत आल्यावर मला खूप प्रेम मिळाले. त्यामुळे त्या गोष्टीला मी विसरू शकले.'
प्रसिध्द भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन; वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रियांकानं नुकतच टेक्स्ट फॉर यू या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलंय. मॅट्रिक्स 4 या चित्रपटात प्रियांका दिसणार आहे. 2021मध्ये प्रियांका कल्पना चावलाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. प्रियांकाच्या 'व्हाइट टायगर' या चित्रपटाची प्रतिक्षा सध्या प्रेक्षक करत आहेत.
Edited By - Prashant Patil