प्रियांका चोप्राने रिलीज केलं तिचं पुस्तक, १२ तासाच्या आत Unfinished बनलं नंबर वन

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 3 October 2020

प्रियांका चोप्राचं पुस्तक 'अनफिनिश्ड' गेल्या १२ तासात अमेरिकेमध्ये बेस्ट सेलर बनले आहेत. प्रियांकाने तिचं हे पुस्तक तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.    

मुंबई- ग्लोबल आयकॉन अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकतंच तिचं पुस्तक 'अनफिनिश्ड' रिलीज केलं आहे. जिथे सिनेजगतात तिची जबरदस्त ओळख बनवली आहे तसंच ती लिखाणाच्या क्षेत्रातंही मागे नाहीये. प्रियांका चोप्राचं पुस्तक 'अनफिनिश्ड' गेल्या १२ तासात अमेरिकेमध्ये बेस्ट सेलर बनले आहेत. प्रियांकाने तिचं हे पुस्तक तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.    

हे ही वाचा: एसपी बालासुब्रमण्यम यांना भारतरत्न देण्याची मागणी, अभिनेते कमल हासननेही केलं समर्थन  

प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिचं हे पुस्तक बेस्ट सेलर बनल्याची माहिती दिली आहे. युएसच्या टॉप १० बुक्सने लिहिलंय, 'गेल्या २४ तासात युएसच्या बेस्ट सेलर्स मध्ये नंबर वनवर प्रियांका चोप्रा जोनसचं पुस्तक अनफिनिश्ड आहे.' यावर त्यांचे आभार मानत प्रियांका चोप्राने लिहिलंय, 'सगळ्यांचे आभार ज्यांनी आम्हाला युएसमध्ये गेल्या १२ तासात नंबर वनवर पोहोचवलं आहे. आशा आहे की तुम्हाला हे पुस्तक आवडेल.' 

अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनांचा उल्लेख केला आहे. ज्यातून मार्ग काढत ती आज इथपर्यंत पोहोचली आहे.याआधी प्रियांकाने या पुस्तकाचं नाव शेअर करत एक पोस्ट केली होती. तिने लिहिलं होतं, 'आश्चर्याची गोष्ट आहे हे नाव माझ्या मनात हे लिहिण्याच्या कित्येक वर्षांआधीच दिलं होतं. २० वर्षांपर्यंत एक पब्लिक पर्सन राहिल्यानंतर ज्यामध्ये आणखी जगण्याविषयी आणि माझ्या पर्सनॅलिटीविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टींची लीस्ट आहे. वैयक्तिक देखील आणि करिअरची देखील. मी खूप जास्त Unfinished आहे. हे लिहिताना मला जाणवलं की Unfinished चा अर्थ माझ्यासाठी खूप खोल आहे. उलट यामध्ये माझ्या आयुष्यातील सगळ्या सामान्य गोष्टी आहेत.'

प्रियांकाच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर तिला शेवटचं 'द स्काय इज पिंक' सिनेमामध्ये पाहिलं गेलं. तिचा आगामी सिनेमा 'द ट्वाहाइट टायगर' आहे ज्याची शूटींग दिल्लीमध्ये झाली होती. याशिवाय 'कॅन बी हिरोज', 'द मॅट्रीक्स  ४' ती सध्या मध्ये काम करतेय.     

priyanka chopra memoir unfinished becomes best seller in last 12 hours  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: priyanka chopra memoir unfinished becomes best seller in last 12 hours