मिशेल ओबामा आणि प्रियांका चोप्रा येणार एकत्र; पण कशासाठी?

संतोष भिंगार्डे
Thursday, 9 July 2020

या महिला वक्तांच्या यादीमध्ये अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा आणि प्रियांका यांची मैत्रीण मेघन मार्कलही आहे.

मुंबई : येत्या 13 आणि 15 जुलै रोजी व्हर्च्युअल गर्ल अप लीडरशिप समिट पार पडणार आहे. हे समिट ऑनलाईन पार पडणार असून यात अनेक आघाडीच्या महिला स्पीकर म्हणून लोकांशी संवाद साधणार आहेत. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिलादेखील या व्हर्च्युअल गर्ल अप लीडरशिप समिटमध्ये गेस्ट स्पीकर म्हणून आमंत्रित केलं गेलं आहे.  

ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांना अखेरचा निरोप; माझगाव कब्रस्थानात झाला दफनविधी...

तिने आज ट्विटरवरून ही बातमी सगळ्यांसोबत शेअर केली. तिने लिहिले, “मुलींमध्ये स्वतः मध्ये, समाजात तसेच आसपासच्या परिसरात बदल घडवून आणण्याची शक्ती असते.  माझ्यासोबत काही मान्यवर आणि  प्रभावी महिला नेत्या आहेत. या समिटमध्ये जरूर सहभागी व्हा." असं म्हणत रजिस्टर करण्याची लिंकसुद्धा तिने सगळ्यांबरोबर शेअर केली. 

लॉकडाऊन असतानाही नवी मुंबईत का वाढतायत कोरोनाचे रुग्ण? जाणून घ्या नेमकी परिस्थिती...

या महिला वक्तांच्या यादीमध्ये अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा आणि प्रियांका यांची मैत्रीण मेघन मार्कलही आहे. 2018 च्या नोबेल शांतता पुरस्कार विजेती नादिया मुराद, फेसबुकच्या सीओओ शेरिल सँडबर्ग आणि अभिनेत्री जमीला जमील यादेखील या समिटच्या माध्यमातून सगळ्यांशी संवाद साधणार आहेत. प्रियांकाने मॅट्रिक्स ४ च्या चित्रीकरणात आता सहभागी होणार आहे. लाॅकडाऊनंतर पहिल्यांदाच ती चित्रीकरणात भाग घेत आहे. मात्र आता या समिटमध्ये प्रियांका काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.  
---
संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: priyanka chopra nad michel obama will came together for virtual girl up leadership summit