Priyanka Chopra च्या बेडरुमची बाल्कनी कायमची केली होती बंद..वडीलांनी रागानं घेतला होता 'तो' निर्णय..वाचा Priyanka Chopra on her transformation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Chopra with Father

Priyanka Chopra च्या बेडरुमची बाल्कनी कायमची केली होती बंद..वडीलांनी रागानं घेतला होता 'तो' निर्णय..वाचा

Priyanka Chopra:बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या तिच्या मुलाखतींच्या माध्यमातून मोठमोठे खुलासे करताना दिसत आहे. मुलाखतीतनं तिनं आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याविषयी बोलत हैराण करून सोडलं आहे.

प्रियंका चोप्रा आपल्या कुटुंबासोबत खूप क्लोज आहे. खासकरुन तिच्या दिवंगत वडीलांना ती खूप मिस करते. अनेकदा तिच्या बोलण्यातून ते दिसून येतं.

अभिनेत्रीनं नुकतंच एका मुलाखतीत खुलासा केला आहे की जेव्हा ती ३ वर्ष परदेशात राहून आली त्यावेळी तिचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झालं होतं जे पाहून तिचे वडील चांगलेच बरसले होते. तिच्या वडीलांना तिचं हे बदललेलं रुप स्विकारणं सुरुवातीला थोडं अवघड गेलं होतं.(Priyanka Chopra on her transformation parents reaction when she returned from us)

अभिनेत्रीनं एका पॉडकास्ट मुलाखती दरम्यान सांगितलं की १३ व्या वर्षी ती आपल्या काका आणि काकीकडे परदेशात शिक्षणासाठी गेली होती. जेव्हा ती गेली होती तेव्हा अतिशय बारीक होती आणि परत भारतात आली तेव्हा तिचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झालं होतं.

तिचा लूक एकदम 'कर्वी' दिसत होता.आणि हेच तिच्या बाबतीत स्विकारणं वडीलांना कठीण जात होतं. त्यांना कळत नव्हतं की एकदम मोठ्या महिलेसारखं दिसणाऱ्या आपल्या तरुण मुलीचं काय करावं.

प्रियंका चोप्रानं याविषयी बोलताना सांगितंल की तो काळ असा होता की तिला लोकांनी आपल्याकडे पाहिलेलं आवडायचं आणि मुलं तिला आवडू लागली होती. आणि याचाच परिणाम म्हणजे तिनं केलेलं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन.

भारतात आल्यावर जेव्हा एक मुलगा प्रियंकाच्या खोलीच्या खिडकीकडे एकटक पाहत होता तेव्हा वडीलांचा संताप अनावर झाला. त्यांनी प्रियंकावर खूप बंधनं घालायला सुरुवात केली. त्यांनी तिच्या खोलीची बाल्कनी देखील कायमची बंद केली होती आणि तिला वेस्टर्न कपडे घालण्यास मनाई केली.

माहितीसाठी सांगतो की प्रियंका चोप्रानं बॉलीवूडमधनं आपलं करिअर सुरु केलं आणि हळूहळू हॉलीवूडकडे आपला प्रवास सुरू केला. आज ती इंटरनॅशनल आयकॉन बनली आहे. तिच्या सिनेमांची जोरदार चर्चा होता.

अभिनेत्री भले लग्न करून आपला पती निक जोनस सोबत परदेशात स्थायिक झाली आहे पण तिचं मन मात्र टोटल हिंदुस्थानी आहे. आगामी प्रोजेक्ट्स विषयी बोलायचं झालं तर फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' मध्ये ती लवकरच दिसणार आहे.