प्रियांकाच्या रास्कलावर सेन्साॅरची नजर!

टीम ई सकाळ
शुक्रवार, 9 जून 2017

मुंबई : प्रियांका चोप्राच्या व्हेंटिलेटरने चांगले यश मिळवले. त्यानंतर तिने एक पंजाबी आणि एक सिक्कीमी सिनेमा केला. आता ती पुन्हा एकदा मराठी सिनेमाकडे वळली आहे. येत्या काळात तिचा काय रे रास्कला हा सिनेमा येणार आहे. पण सिनेमाातल्या रास्कला या शब्दावर सेन्साॅर बोर्ड काय निर्णय घेते त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.  

सिनेमाचे टायटल तिने रजिस्टर केले आहे. पण हे टायटल सेन्सॉर अर्थात सीबीएफसी बोर्डाच्या घशात अडकण्याची दाट शक्‍यता आहे. कारण जिथे सेन्सॉरला साला या शब्दावर आक्षेप आहे, तिथे रास्कला या शब्दाला सेन्सॉर परवानगी देणार का हा खरा प्रश्‍न आहे. याबाबत या सिनेमाच्या सहनिर्मात्या कुनिका सदानंद म्हणाल्या, 'मुळात रास्कला या शब्दावर आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. कारण मुळात ही शिवी नाही. या सिनेमाला काहीसा दक्षिणी टच आहे. तिकडे यन्ना रास्कला म्हणतात, तसे आम्ही काय रे रास्कला असे केले. तिकडे रजनीच्या सिनेमांना ते शब्द चालतोच.' 

सीबीएफसी बोर्ड मात्र आत्ता यावर काही बोलत नाही. यावर एक सदस्य म्हणाला, 'हा सिनेमा सेन्साॅर होण्यासाठी अद्याप आमच्याकडे आलेला नाही. ते आल्यावर काय करायचे ते ठरवू.' या सिनेमात भाग्यश्री मोटे आणि गौरव घाटणेकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर याचे दिग्दर्शन केले आहे, गिरीधरन स्वामी यांनी. या सिनेमात सुप्रिया पाठारे, अक्षर कोठारी, निखिल रत्नपारखी अशी मंडळी आहेत. हा सिनेमा जुलैमध्ये प्रदर्शित होतोय. 

Web Title: Priyanka chopra raskala movie esakal news