'एकदा तरी मला तिची अंतर्वस्त्रं...', दिग्दर्शकाची होती ती इच्छा, त्यानंतर तिनं चक्क...! Priyanka Chopra Interview | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Chopra Interview

Priyanka Chopra Interview : 'एकदा तरी मला तिची अंतर्वस्त्रं...', दिग्दर्शकाची होती ती इच्छा, त्यानंतर तिनं चक्क...!

Priyanka Chopra Interview : आता भलेही प्रियंका ही बॉलीवूडमधून हॉलीवूडमध्ये गेली असेल पण तिची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. इंस्टावर सर्वाधिक फॉलोअर्स, जाहिरातीसाठी सर्वाधिक मानधन घेणारी, चित्रपट निर्माती, ऑस्कर सारख्या सोहळ्याच्या समितीमध्ये सहभाग असणाऱ्या प्रियंकाला सुरुवातीच्या काळात अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता.

प्रियंकानं एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये जे सांगितलं ते भलतंच धक्कादायक होतं. खरं तर यापूर्वी देखील प्रियंकानं तिला कास्टिंग काऊच्या संदर्भात जे अनुभव आले त्याविषयी सोशल मीडियावर खुलासे केले होते. ते धक्कादायक होते. प्रियंकाला परदेशात देखील अनेकदा तिच्या रंगावरुन शेरेबाजी करण्यात आल्याचे तिनं सांगितले होते. मात्र या अभिनेत्रीनं आता हॉलीवूडमध्ये तिच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

त्या मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियंका म्हणते, करिअरच्या सुरुवातीच्या काळात माझा सामना एका चुकीच्या दिग्दर्शकाशी झाला होता. त्यानं मला त्या जाहिरातीमध्ये आणखी स्टायलिस्ट दिसण्यासाठी माझ्या अंतर्वस्त्रासंबंधी काही सुचना केल्या होत्या. काही केल्या त्या फिल्ममध्ये माझी अंतर्वस्त्रं दाखवली गेली पाहिजेत. असे त्याचे म्हणणे होते. नाहीतर ती फिल्म कुणी पाहणार नाही. असे त्या दिग्दर्शकाचे म्हणणे होते. हे ऐकून मला धक्का बसला होता. कारण यापूर्वी असे कोणतेही बोलणे झाले नव्हते.

त्यानंतर प्रियंका खूप नाराज झाली होती. ज्यावेळी तिला बॉलीवूडपासून लांब का गेलीस असा प्रश्न विचारला जातो तेव्हा ती यासारखी अनेक उदाहरणे देत आपण जे केलं ते चूक की बरोबर हे लोकांनी ठरवू नये असे सांगते. मला त्यावेळी खूप त्रास झाला. इंडस्ट्रीमध्ये राहण्यासाठी त्या लोकांसोबत नाते टिकवण्यासाठी प्रसंगी बीफही खावे लागले. बॉलीवूडमधील पॉलिटिक्सनं मी थकून गेले होते. त्यानंतर मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. असे प्रियंकानं सांगितले आहे.

ती घटना आहे २००३ च्या दरम्यानची त्या दिग्दर्शकाला माझी अंतर्वस्त्रं पाहायची होती. त्यासाठी त्याचा आग्रह होता. मी तेव्हा नवीन होते. हा सगळा प्रकार माझ्यासाठी नवीनच होता. त्या दिग्दर्शकानं ती गोष्ट मला थेट न सांगता माझ्या स्टाईलिस्टला सांगितली होती. तेव्हा मला जाणवले कला महत्वाची नाही तर अंगप्रदर्शनाला जास्त भाव दिला जातो आहे. कलाकार म्हणून आपण जे योगदान देतो त्याचा कुणीही विचार करत नाही. अशी खंत प्रियंकानं व्यक्त केली होती.