प्रियांका शिकतेय पियानो, पती निककडून घेतेय प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास सध्या तिच्या पतीसह गायक निक जोनाससोबत लॉस एंजलिसला आहे. तिथेही लॉकडाऊन असल्याने ती देखील तिचा वेळ घरच्यांसोबत घालवत आहे. पीसी लॉकडाउनमध्ये पती निककडून पियानोचे प्रशिक्षण घेत आहे.

 मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन असताना अत्यावश्यक सेवेत असणारे कर्मचारीच फक्त काम करताना दिसत आहेत. देशाची परिस्थिती गंभीर असल्याने हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. आता लॉकडाऊन चौथ्या टप्प्यात पोहचले आहे. यातच दोन महिन्यांपासून संपूर्ण चित्रपटसृष्टी थंडावली आहे. मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण देखील बंद करण्यात आले आहे. सतत चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असलेले हे कलाकार देखील घरात बसले आहेत. सगळेच कलाकार या क्वारंटाईनच्या काळात नवनवीन गोष्टी करताना आणि शिकताना दिसत आहेत. कोणी शेफ बनलंय, तर कोणी घराची साफसफाई करत आहेत. शिवाय या काळात सर्वच जण आपला बराचसा वेळ सोशल मिडियावर घालवताना दिसतात.

हे ही वाचा - ...म्हणून लॉकडाऊनमध्ये दिल्लीला पोचली अभिनेत्री स्वरा भास्कर

अशातच बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास सध्या तिच्या पतीसह गायक निक जोनाससोबत लॉस एंजलिसला आहे. तिथेही लॉकडाऊन असल्याने ती देखील तिचा वेळ घरच्यांसोबत घालवत आहे. पीसी लॉकडाउनमध्ये पती निककडून पियानोचे प्रशिक्षण घेत आहे. भारताप्रमाणे लॉस एंजेलिसमध्ये लॉकडाऊन असल्याने पीसी निकसोबत बराचसा वेळ घालवत आहे. विशेष म्हणजे या लॉकडाऊनमध्ये ती काहीतरी नवीन शिकण्याच्या प्रयत्नात आहे.

COVID-19 lockdown: Nick Jonas teaches Priyanka how to play the ...

या दिवसात ती निककडून पियानो शिकत आहे. रोज ४० ते ४५ मिनिटे निक तिला पियानोचे ट्रेनिंग देतो. नुकताच प्रियांकाने एका मुलाखतीत याची माहिती दिली आहे. ती म्हणाली, 'मी पियानो शिकण्यास सुरुवात केली आहे. निक मला हे वाजवायला शिकवत आहे. मी याआधी कधीही पियानो वाजविला नाही आहे. पण एखाद वाद्य शिकण्याची आवड माझ्यात आधीपासूनच होती.

Priyanka Chopra staying busy quarantine with piano lessons by Nick ...

त्यामुळे निक रोज मला ३० ते ४५ मिनिटे पियानो वाजवायला शिकवतो.'याशिवाय निक प्रियांकाबद्दल म्हणाला की, 'प्रियांका म्युझिकल आहे आणि तीच करिअर देखील म्युझिकल आहे. तिने गाणं देखील गायले आहे. पण तिला शिकवण्यासाठी मी एक चांगला टीचर नाही.'  याशिवाय दोघांच्या लग्नाला दीड वर्ष झालं आहे. मात्र दोघांच्या कामामुळे त्यांना फारसा वेळ एकत्र घालवता येत नव्हता. आता मात्र लॉकडाऊनमुळे ते बराच वेळ एकत्र घालवत आहेत.

priyanka chopras piano teacher nick jonas reviews her progress


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: priyanka chopras piano teacher nick jonas reviews her progress