'मी हव्या तितक्या मिरच्या खाऊ शकते'...

मी आहे स्ट्रॉंग भारताची स्ट्र्रॉंग मुलगी!
प्रियंका चोप्रा
प्रियंका चोप्रागुगल

प्रियंका चोप्रा आता भारतात राहत नसली तरी भारताविषयीचं तिला असलेलं प्रेम ब-याचदा ती आपल्या सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून व्यक्त करीत असते. इतकंच नाही तर आपल्या अमेरिकन नव-याकडूनही ती भारतीय संस्कृतीचा-संस्कारांचा मान राखत पूजेचे विविध विधी करुन घेत असते. मग अगदी लॉस एंजलिस येथील तिच्या नवीन घराच्या वास्तूशांती निमित्तानं केलेली पूजा असो की दिवाळी निमित्तानं तिच्या घरच्या पार्टीचं भारतीय पद्दतीनं केलेलं सेलिब्रेशन असो...असे कितीतरी प्रियंकाच्या भारतप्रेमाचे दाखले देता येतील. असाच सध्या प्रियंका चोप्राचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि तिच्या लाखो चाहत्यांनी त्यावर तिचं कौतूक करणा-या कमेंट्स दिल्या आहेत.

कॅनडाची प्रसि्द्ध युट्युबर,कॉमेडियन लीली सिंग हीच्या घरी दिवाळी निमित्ताने एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्या पार्टीत बॉलीवूड-हॉलीवूडचे अनेकजण उपस्थित होते आणि प्रत्येकजणानं भारतीय परंपरेविषयी काय आवडतं याविषयीचे आपले विचार व्हिडीओत बोलून दाखविले आहेत. या व्हिडीओत प्रियंका सोबत अमेरिकन अॅक्ट्रेस,कॉमेडियन,स्क्रीन रायटर मिंडी कालिंग हिनेही आपलं भारत प्रेम मार्मिक शब्दात व्यक्त केलंय. या व्हिडीओत आपल्याला दिसेल की जेव्हा प्रियंकाला भारताविषयी काय आवडतं असं विचारलं गेलंय तेव्हा लगेचच तिने कॅमे-याच्या दिशेने फ्लाईंग कीस दिलाय. त्यावेळी भारताविषयी तिला काय वाटतं ह्याचा आनंद तिच्या चेह-यावरही दिसतोय. आणि लगेचच ती मोठ्याने हसत म्हणतेय,"भारतात मिरच्याही खूप चवी-चवीने आवडीने खाल्ल्या जातात ते मला फार आवडते. मी ही हव्या तितक्या मिरच्या खाऊ शकते. मी भारतीय आहे".

पार्टीचं आयोजन केलेल्या लीली सिंगनेही आपल्या मांग टिक्कयाकडे लक्ष केंद्रित करून भारताची परंपरा आपल्याला आवडते असं म्हटलंय. आपल्या आई-वडीलांकडून हा भारतीय वारसा आपल्याकडे आल्याचं ती म्हणाली. तर अमेरिकन अॅक्ट्रेस मिंडी म्हणाली,'भारतात एका छताखाली विविध परंपरा जपल्या जातात ते मला फार आवडतं'. लीली सिंगने अमेरिकेत आयोजित केलेल्या ह्या पार्टीची थीम होती लव्ह अॅन्ड लाईट. तिने या सेलिब्रेशनचे अनेक फोटो,व्हिडिओ शेअर केले आहेत. आणि तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय,'दिवाळीची ही रात्र माझ्यासाठी स्वप्नवत. एखादा सिनेमाच म्हणूया नं. ज्याची सुरुवात आणि शेवटही गोड. प्रेम आणि प्रकाश दोन्हीही आनंद देणारं. परफेक्ट इंडियन देसी तडका,जल्लोष,उत्साह आणि खूप काही'.

प्रियंका चोप्रा
आलिया भट म्हणाली,''व्वा! सासुबाई खूप सुंदर''

प्रियंकानं नुकताच आपल्या नव्या घरातील पूजेचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्यात तिच्यासोबत तिचा पती नीक जोनसही हात जोडून पुजेला बसला होता. त्या फोटोवर तिने पोस्ट लिहिली होती,'नव्या घरातील पहिली दिवाळी आम्ही एकत्र साजरी करीत आहोत. हे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे'.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com