प्रियांकाला मिळणार पे हाइक? 

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

2016 हे वर्ष प्रियांकासाठी खऱ्या अर्थाने लकी वर्ष ठरलं. ती सध्या क्वांटिको या तिच्या हॉलीवूड मालिकेसाठी काम करतेय. लवकरच तिचा ड्‌वेन जॉन्सन आणि झॅक एफ्रॉनबरोबरचा बेवॉच हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मराठीमधील तिची निर्मिती असलेला व्हेंटिलेटर हा चित्रपटही चांगलाच हिट झाला. फोर्बस्‌च्या रिपोर्टप्रमाणे 2015-2016 या वर्षातील प्रियांका ही सगळ्यात जास्त मानधन कमावणारी अभिनेत्री ठरली आहे.

तिने हॉलीवूडमध्येही आपला चांगला दबदबा निर्माण केला आहे. प्रत्येक टॉक शोपासून ते तेथील लिडिंग मॅगझिनच्या कव्हर पेजपर्यंत सगळीकडे प्रियांका झळकली आहे. बिलबोर्ड म्युझिक ऍवॉर्डस्‌ , एमी ऍवॉर्डस्‌ , ऑस्कर ऍवॉर्डस्‌ मध्ये उपस्थिती राहिल्यानंतर ती आता गोल्डन ग्लोब्स ऍवॉर्ड 2017मध्येही उपस्थित राहणार आहे. तिच्याकडे नवीन नवीन हॉलीवूडच्या ऑफर्सही येत आहेत. त्यामुळे तिचे आता हॉलीवूडमध्ये मानधन वाढणार यात शंका नाही. 2017मध्ये ती भारतातील सगळ्यात जास्त मानधन मिळवणारी अभिनेत्री म्हणूनही नावारूपाला आली तर आश्‍चर्य वाटायला नको..

Web Title: Priyanka will pay hike?