
प्रियांशु गर्लफ्रेंड वंदनाला गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांचं लग्न कोविडच्या गाईडलाईन्स लक्षात घेत घेत पार पडलं.
मुंबई- अभिनेता प्रियांशु पेनयुली आणि वंदना जोशी यांनी डेहराडूनमध्ये एकमेकांसोबत लग्न केलं. मिर्जापूर या प्रसिद्ध वेबसिरीजमध्ये रॉबिनची भूमिका साकारुन प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवणारा प्रियांशु गर्लफ्रेंड वंदनाला गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांचं लग्न कोविडच्या गाईडलाईन्स लक्षात घेत घेत पार पडलं.
प्रियांशुने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांशु वंदनाला एका स्पोर्टी माऊंटेन बाईकवर बसवून घेऊन जात आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्याने लिहिलंय, ''माझ्या सुंदर पत्नीला घेऊन जात आहे. आणि आम्ही आता एकत्र जात आहोत एक नवीन सुंदर सुरुवात करण्यासाठी.''
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये लग्नाच्या दरम्यानचे काही खास क्षण कॅमेरामध्ये बंद केले आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दोघांनी एकमेकांला वरमाला घातलेल्या फोटो देखील आहेत. लग्नजोड्यात दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. दोघांनी कॉम्बिनेशन करत पिंक आणि गोल्डन रंगाचा पेहराव केला आहे.
लग्नाच्या आधीचे मेहेंदी आणि हळदीच्या फंक्शनचे फोटो देखील वंदनाने सोशल मिडियावर शेअर केले होते. त्यातही ती खूप सुंदर दिसत होती. प्रियांशुने सांगितलं होतं की या वर्षाच्या सुरुवातीला दोघं लग्न करणार होते मात्र तेव्हा त्यांच्याकडे तारीख नव्हती. आणि नंतर मग कोविडचं संकट आल्याने लग्न टळत गेलं. आता अखेर दोघंही विवाहबंधनात अडकले आहेत.
priyanshu painyuli vandana joshi wedding in dehradun photos and videos