producer ekta kapoor alt balaji deletes poster of web series his story apologizes to makers of loev
producer ekta kapoor alt balaji deletes poster of web series his story apologizes to makers of loev

अखेर एकता कपूरच्या बालाजी अल्टनं मागितली माफी; किस्सा पोस्टर चोरीचा 

मुंबई - टेलिव्हिजन क्षेत्रातील क्वीन अशी ओळख असणा-या एकता कपूरच्या बालाजी अल्ट काही दिवसांपूर्वी वादाच्या भोव-यात सापडली होती. आता तो वाद संपण्याची चिन्हं आहेत. याचे कारण म्हणजे एकता कपूरच्या या प्रॉडक्शन कंपनीनं माफी मागितली आहे. त्या माफीनाम्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एकताच्या हिज स्टोरी नावाची मालिकेचे पोस्टर प्रदर्शित होताच वादाच्या भोव-यात सापडले होते. त्या पोस्टरवर चोरीचा आरोप करण्यात आला होता. लोएवच्या मेकर्सनं अल्ट बालाजीवर चोरीचा आरोप केल्यानं वाद आणखी चिघळला होता. अखेर अल्ट बालाजीनं ती पोस्ट डिलिट केली आहे. आणि निर्मात्यांनी माफी मागितली आहे.

काही दिवसांपूर्वी एकता कपूरच्या प्रॉडक्शन हाऊस अल्ट बालाजीनं आपल्या हिज  स्टोरी नावाच्या मालिकेचं पोस्टर्स लाँच केलं होतं. त्यावर फिल्ममेकर सुधांशु सरिया यांनी त्यांच्या लोएव या चित्रपटाचं पोस्टर्स अल्ट बालाजीनं चोरी केल्याचा आरोप केल्याचे व्टिट केले होते. त्यांनी म्हटले होते, ही इंडस्ट्री अशी का आहे, आम्ही एवढ्या मेहनतीनं तयार केलेलं पोस्टर काही बुध्दिजीवी लोकांनी चोरी केल्याचं दिसून आलं. त्यामुळे फार वाईट वाटले. मात्र ते कोणी ते कबूल करायलाही मागत नाही. असा हा सगळा प्रकार आहे. लोकं असं का वागतात. त्यांना आपण काय करतो आहोत हे कळत नाही का, आपल्या कलाकृतीला दुस-या कुणाच्या कलाकृतीतलं काही लावणं चूकीचं नाही का, असा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे.

आमच्या 13 लोकांच्या टीमनं ते पोस्टर्स तयार केलं होतं. अशावेळी त्यांना जेव्हा कळलं की आपलं पोस्टर्स दुसरं कोणी चोरलं आहे तेव्हा त्यांना काय वाटलं असेल. याचा विचारही कुणी केला नाही. त्यामुळे अशाप्रकारचे चोरी करणा-यांनी सगळा विचार करायला हवा होता. यासगळ्या प्रकारानंतर अल्ट बालाजीनं इंस्टावर एक स्टोरी अपडेट केली आहे. त्यात त्यांनी आपला माफीनामा शेअर केला आहे. त्यांनी लिहिलं आहे 9 एप्रिल रोजी हिज पोस्टर्स प्रदर्शित केले होते. त्यावेळी आम्हाला सुधांशुच्या लोएव च्या पोस्टर्सविषयी कळाले. असा प्रकार पुन्हा होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. हे आमच्या डिझाईन टीमचे काम होते. त्यांच्यावतीनं आम्ही सर्वांची माफी मागतो. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com