निर्माता झाला अभिनेता 

- अरुण सुर्वे
मंगळवार, 2 जानेवारी 2018

लहानपणापासून नृत्य, नाटक अन अभिनयाची आवड असल्यामुळे योगेश भोसले याने शिक्षण घेत असतानाच या क्षेत्रात अनेक पारितोषिके मिळविली. त्यामुळे अभिनयाची गोडी लागली अन तो अभिनेता बनण्याचे स्वप्न पाहू लागला. दरम्यान, "अमर प्रेम' या मालिकेच्या प्रॉडक्‍शन मॅनेजर म्हणून कामाला सुरवात केली. अशा प्रकारे या क्षेत्रात काम करत असतानाच एक दिवस योगेशच्या मनात चित्रपट निर्मितीचा विचार आला. त्यासाठी वडिलांना तयार करून "बाजार' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. तसेच, मुख्य भूमिकाही साकारली. नोयडा फिल्म फेस्टिवलमध्ये 22 देशांतून आलेल्या चित्रपटांमधून "बाजार'ला "उत्कृष्ट चित्रपटा'चा पुरस्कार मिळाला.

लहानपणापासून नृत्य, नाटक अन अभिनयाची आवड असल्यामुळे योगेश भोसले याने शिक्षण घेत असतानाच या क्षेत्रात अनेक पारितोषिके मिळविली. त्यामुळे अभिनयाची गोडी लागली अन तो अभिनेता बनण्याचे स्वप्न पाहू लागला. दरम्यान, "अमर प्रेम' या मालिकेच्या प्रॉडक्‍शन मॅनेजर म्हणून कामाला सुरवात केली. अशा प्रकारे या क्षेत्रात काम करत असतानाच एक दिवस योगेशच्या मनात चित्रपट निर्मितीचा विचार आला. त्यासाठी वडिलांना तयार करून "बाजार' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. तसेच, मुख्य भूमिकाही साकारली. नोयडा फिल्म फेस्टिवलमध्ये 22 देशांतून आलेल्या चित्रपटांमधून "बाजार'ला "उत्कृष्ट चित्रपटा'चा पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यातील बुधवार पेठेमध्ये झाले आहे. 

याबाबत योगेश म्हणाला, ""राणी मुखर्जीची प्रमुख भूमिका असलेल्या "आय्या' या चित्रपटावरुन "बाजार'ची कल्पना सुचली व डॉ. भालचंद्र गायकवाड यांच्या मदतीने मी या चित्रपटाची निर्मिती केली. जीवनात किती प्रकारचे बाजार मांडले आहेत, त्याचे वास्तववादी चित्रीकरण "बाजार'मध्ये आहे. त्याचबरोबर "आंबेडकर नगर' हा चित्रपट करत असून त्याचे 60 टक्के चित्रीकरण पूर्ण झाले आहे. "एक मराठा- लाख मराठा' या चित्रपटातही मी खलनायकाची भूमिका साकारली. त्याचबरोबर "घाट'मध्येही अभिनय केला आहे.'' 
 

Web Title: producer yogesh bhosle actor