'देवाला तरी घाबरा'; पॉर्न प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर गहना वशिष्ठचं ट्विट

राज कुंद्राच्या कंपनीतील तीन निर्माते आणि गहनाविरुद्ध गुन्हा दाखल
gehana vasisth
gehana vasisth

एका अभिनेत्रीच्या तक्रारीवरून मालवणी पोलीस ठाण्यात उद्योजक राज कुंद्राच्या कंपनीतील तीन निर्माते आणि अभिनेत्री गहना वशिष्ठविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'हॉटशॉट्स' या अॅपसाठी बळजबरीने पॉर्न व्हिडीओ शूट करून घेतल्याचा आरोप पीडितेने केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गहनाने ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. 'थोडीतरी लाज बाळगा आणि देवाला घाबरा', असं तिने ट्विटमध्ये म्हटलंय. चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली अश्लील व्हिडीओ बनवून राज कुंद्राच्या कंपनीने ते हॉटशॉट्स अॅपवर अपलोड केल्याचा आरोप संबंधित अभिनेत्रीने केला आहे. या गुन्ह्यात अजय श्रीमंत, अभिजीत हरिश्चंद्र, गहना वशिष्ठ, प्रिन्स कश्यप अशी आरोपींची नावे आहेत. हे प्रकरण पुढील तपासासाठी प्रॉपर्टी सेलकडे पाठवण्यात आलं आहे. अश्लील चित्रफितनिर्मिती आरोपप्रकरणी उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला १९ जुलै रोजी गुन्हे शाखेने अटक केली. (Producers of Raj Kundras Company and Gehana Vasisth Booked slv92)

गहना वशिष्ठचं ट्विट-

'मनापासून अभिनंदन, गुन्हा दाखल करण्यासाठी अखेर तुम्हाला एक मुलगी मिळालीच. किती घाणेरडं राजकारण करत आहात तुम्ही. थोडीतरी लाज बाळगा आणि देवाला घाबरा. हा खेळ थांबवा. देव तुम्हाला नक्कीच शिक्षा देईल आणि देवापेक्षा मोठं कोणीच नाही', असं गहनाने ट्विटमध्ये लिहिलंय.

gehana vasisth
आरोप, अटक, जामिन.. गहना वशिष्ठचा व्हिडीओ व्हायरल

नेमकं काय आहे प्रकरण?

लॉकडाउनच्या काळात फारशी ओळख नसलेल्या दोन छोट्या अभिनेत्रींचा काम मिळवण्यासाठी संघर्ष सुरु होता. कामाच्या शोधाच्या निमित्ताने त्या आरोपींच्या संपर्कात आल्या. आरोपींनी त्यांना पद्धतशीरपणे पॉर्नच्या रॅकेटमध्ये अडकवलं. गहना वशिष्ठ, रोवा खान आणि तन्वीर खान या तिन्ही आरोपींनी व्हिडिओमध्ये काम करण्यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती केली. तिन्ही आरोपी व्हिडिओ बनवून ते अरविंद श्रीवास्तव उर्फ यश ठाकूर आणि राज कुंद्राला विकायचे. त्यानंतर हे व्हिडिओ हॉट हिट, न्युफ्लिक आणि हॉट शॉट या अ‍ॅपवर अपलोड केले जायचे, असा आरोप पीडितेने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com