संजू चित्रपट म्हणजे 'अर्धसत्य' - उज्वल निकम

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जुलै 2018

बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला. चित्रपटाला वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंगही मिळाली. परंतु, सरकारी वकील यांनी या चित्रपटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संजू या चित्रपटात अपूर्ण गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत असे निकम यांनी म्हटले आहे.

मुंबई - बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला. चित्रपटाला वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंगही मिळाली. परंतु, सरकारी वकील यांनी या चित्रपटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संजू या चित्रपटात अपूर्ण गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत असे निकम यांनी म्हटले आहे.

१९९३ पूर्वी मुंबई बॉम्बस्फोटातील महत्त्वाचा आरोपी अबू सालेम एका गाडीतून हँडग्रेनेड्स आणि रायफल घेऊन संजय दत्तच्या घरी आला होता. पाच एके ५६ रायफल्स आणि सात हँडग्रेनेड्स काही दिवस त्याच्या घरी ठेवण्यात आले होते. ही बाब संजयने पोलिसांना कळवली असती तर निरपराध लोकांचे प्राण वाचले असते, हे या चित्रपटात का दाखवण्यात आले नाही, असा प्रश्न उज्वल निकम यांनी एका मुलाखतीत उपस्थित केला आहे.

त्याचबरोर, वडील खासदार असल्याने संजयच्या घरी पोलीस संरक्षण होते. मग संरक्षणाच्या नावाखाली शस्त्र बाळगण्याचं काय कारण असा प्रश्नही निकम यांनी उपस्थित केला आहे. या चित्रपटात या सर्व गोष्टी दाखवणे गरजेचे होते असे निकम यांनी सांगितले आहे.

दरम्यान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित 'संजू' चित्रपट गेल्या शुक्रवारी (ता.29) प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने साकारली असून, संजय दत्तच्या आयुष्यात नेमके काय घडले याची सत्यकथा या चित्रपटातून उतरवण्याचा प्रयत्न राजकुमार हिरानी यांनी केला. या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित माहिती देण्यात आली आहे. संजय दत्त जसा होता, अगदी तशीच बाजू या चित्रपटात दाखवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसह अभिनेता परेश रावल, अनुष्का शर्मा, विकी कौशल, दिया मिर्झा, सोनम कपूर, करिश्मा तन्ना आणि मनिषा कोईराला यांच्या भुमिका आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public Prosecutor Ujjwal Nikam Raised Question On Rajkumar Hirani Movie Sanju