पुण्याचा लघुपट ‘यूएन’च्या परिषदेत

पुणे - ‘ब्रेक द बायस’ या चित्रफितीची निर्मिती करणारे कलाकार.
पुणे - ‘ब्रेक द बायस’ या चित्रफितीची निर्मिती करणारे कलाकार.

पुणे - इंटरनॅशनल एज्युकेशन ॲण्ड रिसोर्स नेटवर्क (आय अर्न) इंडिया या संस्थेच्या पुणे शाखेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘ब्रेक द बायस’ हा लघुपट संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) एका परिषदेत दाखवला जाणार आहे. जुळ्या मुलांच्या आयुष्याच्या विविध टप्प्यावर लिंगभेदामुळे कसे परिणाम होतात व शेवटी हे सर्व बदलायला पाहिजे, असा ते निर्णय घेतात, अशा आशयाची कथा यात मांडण्यात आली आहे.

येत्या २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या ‘शाश्‍वत विकास ध्येये’ या न्यूयॉर्क येथे होणाऱ्या परिषदेत हा लघुपट दाखविण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने १७ शाश्‍वत विकास ध्येये निर्देशित केली आहेत. त्यापैकी आरोग्य व निरामयता आणि लिंग समानता या दोन ध्येयावर आय अर्नमधील मुलांनी काम करत हा लघुपट तयार केला आहे. यामध्ये अनिश फणसळकर, मिहीर पोतनीस, साक्षी गाडगीळ यांचा प्रमुख सहभाग असून अवनी कोंडेजकर, रोहन धोत्रे, सुखदा भावे, चैतन्य मंत्री, सचित लेले, ओंकार जोशी, केतकी पाटेकर, अहना आगाशे हे सहकलाकाराच्या भूमिकेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com