नाटक Unlock : पुनश्च हरिओम म्हणत प्रशांत दामलेंनी चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

pune theatres
pune theatres

मुंबई- अभिनेते-निर्माते प्रशांत दामले यांच्या एका फेसबुक पोस्टची कालपासूनंच खूप चर्चा सुरू होती. त्यांच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये आधी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र तरीही या पोस्टचा अर्थ काय असेल याचा अंदाज बांधण्याची सुरुवात झाली आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. प्रशांत दामले यांनी या पोस्टमध्ये लवकरच एक मत्त आनंदाची बातमी मी देणार, अशी पोस्ट फेसबुकवर लिहिली होती. त्यांच्या या 'मत्त' शब्दानेच सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं होतं.  

प्रशांत दामले यांनी पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे चाहत्यांसाठी एक खरंच आनंदाची बातमी आणली आहे. ही बातमी खास नाट्यरसिकांसाठी आहे. प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा १२ डिसेंबर आणि १३ डिसेंबर रोजी पुण्यात पुनश्च हरिओम होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. फेसबुक पोस्टमधून प्रशांत दामले यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे सिनेमांच्या थिएटर प्रमाणेच आता हळूहळू नाट्यगृह देखील अनलॉक होण्याच्या दिशेने असल्याचं दिसतंय. 

प्रशांत दामले यांच्या या पोस्टनंतर अनेक नाट्यरसिकांनी पुन्हा प्रयोग सुरू करण्याच्या त्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. “आम्ही अनेक दिवसांपासून याची वाट पाहत होतो. तुमच्या या निर्णयामुळे बॅक स्टेज कलाकारांनाही दिलासा मिळेल आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,” अशी कमेंट एका रसिक प्रेक्षकाने केली आहे. “आम्ही यापूर्वीही हे नाटक पाहिलं आहे परंतु आता पुन्हा हे नाटक पाहायला नक्कीच येऊ,” अशी कमेंट एका ज्येष्ठ नागरिकाने केली आहे. तसंच अनेकांनी कलाकारांची आणि प्रेक्षकांची काळजी घेण्याची विनंती करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोना काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आर्थिक संकटात सापडलेल्या पडद्यामागील कलाकारांना मदतीचा हात देणा-या अनेकांचा सन्मान करण्यात आला होता. त्यापैकी एक होते प्रशांत दामले. दामले यांचा राजभवनात सत्कार करण्यात आला होता. 

pune theatres open from 12th november prashant damle posted on facebook  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com