
अल्लू अर्जूनचा 'पुष्पा द राईज' या ब्लॉकबास्टर चित्रपटानंतर आता त्याच्या आगामी 'पुष्पा द रूल' या चित्रपटाची प्रेक्षकांना आतुरता लागलेली आहे.या चित्रपटाच्या शुटिंगलाही सुरूवात झालेली आहे.अलीकडेच अल्लू अर्जून वाढवलेल्या केसांत आणि मोठ्या दाडीत पुष्पा लूकमधे दिसून आला.या लूक मधे प्रेक्षकांना विशेष वाटलं ते म्हणजे अल्लू अर्जूनचं वाढलेलं वजन.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्लू अर्जूनने त्याच्या पुष्पा द रूल या आगामी चित्रपटासाठी त्याचे वजन अती जास्त वाढवलेले आहे.मात्र त्याच्या वाढत्या वजनामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल देखिल व्हावं लागलं.(Shaming Comment) त्याच्या वाढत्या वजनातील फोटोवर नेटकऱ्यांनी त्याला शेमिंग कमेंट केले आहे.अल्लू अर्जूनचा पहिल्या चित्रपटाचा विचार केला तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल केली होती.
मात्र त्याच्या याच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या लूकसाठी त्याला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागतं आहे.एका नेटकऱ्याने तर 'हा तर वडापावच दिसतोय', असा कमेंट केलाय.तर दुसऱ्याने 'हा तर दिवसेंदिवस म्हातारा होत चाललाय', असा कमेंट केलाय.(Netizens) तर तिसऱ्याने 'हा तर सडकछाप चोरासारखा दिसतोय' असंही म्हटलंय.पुष्पा चित्रपटासाठी कायम चर्चेत असणाऱ्या अल्लू अर्जूनला त्याच चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टच्या लूक आणि लट्ठपणासाठी ट्रोल केलं जातंय.नुकत्याच शुटिंगला सुरूवात झालेला हा चित्रपट आता पडद्यावर आल्यावर काय कमाल करतो ते वेळच सांगेल.