पीव्हीआर सिनेमाचा "वकाओ' वेबमंच 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 जानेवारी 2017

मुंबई :  आपल्या परिसरातील चित्रपटगृहामध्ये कोणता चित्रपट प्रदर्शित व्हावा हे निवडण्याचा अधिकार आता प्रेक्षकांना मिळणार आहे. भारतातील चित्रपट वितरण क्षेत्रातील पीव्हीआर सिनेमाने वकाओ (vkaao.com) हा वेबमंच सुरू केला आहे. या वेबमंचद्वारे "थिएटर ऑन डिमांड सेवा' देणारी पीव्हीआर ही भारतातील ही पहिलीच कंपनी ठरली आहे. वकाओच्या स्टुडिओ आणि स्वतंत्र चित्रपटाच्या कलेक्‍शनमधून वैयक्तिक निवडीच्या कार्यक्रमांसाठी पीव्हीआर सिनेमाद्वारे थिएटर उपलब्ध करून दिले जाणार आहे. या वेबमंचाचे नुकतेच भारतात अनावरण करण्यात आले.

मुंबई :  आपल्या परिसरातील चित्रपटगृहामध्ये कोणता चित्रपट प्रदर्शित व्हावा हे निवडण्याचा अधिकार आता प्रेक्षकांना मिळणार आहे. भारतातील चित्रपट वितरण क्षेत्रातील पीव्हीआर सिनेमाने वकाओ (vkaao.com) हा वेबमंच सुरू केला आहे. या वेबमंचद्वारे "थिएटर ऑन डिमांड सेवा' देणारी पीव्हीआर ही भारतातील ही पहिलीच कंपनी ठरली आहे. वकाओच्या स्टुडिओ आणि स्वतंत्र चित्रपटाच्या कलेक्‍शनमधून वैयक्तिक निवडीच्या कार्यक्रमांसाठी पीव्हीआर सिनेमाद्वारे थिएटर उपलब्ध करून दिले जाणार आहे. या वेबमंचाचे नुकतेच भारतात अनावरण करण्यात आले. या वेळी पीव्हीआर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार बिजली, अभिनेता हृतिक रोशन, यामी गौतम आणि पीव्हीआर पिक्‍चर्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमल ज्ञानचंदानी उपस्थित होते. पीव्हीआर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार बिजली म्हणाले की, वकाओद्वारे सिनेमाच्या प्रेक्षकांना त्यांच्या आवडीचा सिनेमा, जवळचे चित्रपट, सिनेमाची वेळ इत्यादी गोष्टी ठरवून त्यांच्या ऑनलाईन वर्तुळात तातडीने त्याची माहिती देता येईल. सिनेमाच्या खेळासाठी आवश्‍यक प्रेक्षकांनी आपली उपस्थिती निश्‍चित केल्यानंतर स्क्रीनिंग निश्‍चित केले जाईल आणि वकाओ थिएटरचे आरक्षण, तिकिटांचे व्यवस्थापन, विनाअडथळा स्क्रीनिंग इत्यादी बाबींकडे लक्ष देईल, ज्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाचा आस्वाद घेता येईल. 
 

Web Title: PVR Vkooa Web series