अख्ख्या विमानात एकटाचं: भुत बंगल्यासारखं वाटलं, आर माधवनचा अनुभव

केवळ बॉलीवूडच bollywood नाही तर साऊथमध्येही south आपल्या अभिनयासाठी प्रसिध्द असणारा अभिनेता म्हणून आर माधवनचं r madhvan नाव घेता येईल.
अख्ख्या विमानात एकटाचं: भुत बंगल्यासारखं वाटलं, आर माधवनचा अनुभव

केवळ बॉलीवूडच bollywood नाही तर साऊथमध्येही south आपल्या अभिनयासाठी प्रसिध्द असणारा अभिनेता म्हणून आर माधवनचं r madhvan नाव घेता येईल. तो सोशल मीडियावर social media अॅक्टिव्ह असणारा अभिनेता आहे. याशिवाय वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांमध्येही तो भाग घेतो. सामाजिक, राजकीय धोरणं आणि निर्णयांबद्दल त्याची स्वताची काही मतं आहेत. तो ती आग्रहानं मांडताना दिसतो. असा अभिनेता आर माधवन आता चर्चेत आला आहे. त्याचे कारण त्यानं शेयर केलेली पोस्ट. त्यानं एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यावेळी तो विमानात होता. आणि त्या विमानात त्याच्याशिवाय दुसरं कुणीही नाही. हे त्यात दिसत आहे.

आर माधवननं आपला आगळा वेगळा विमानाचा प्रवास आणि त्याविषयी सांगितलं आहे. त्या व्हिडिओला सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी आर माधवननं आपले काही किस्सेही चाहत्यांना शेयर केले आहेत.त्यावर चाहत्यांनी त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही दिल्या आहेत. त्याचं झालं असं की, आर माधवननं एका फ्लाईटमधून प्रवास केला. त्या प्रवासानं त्याला एका वेगळ्या प्रकारचा अनुभव दिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ज्या विमानप्रवासात तो एकटाच होता.

आपण संबंध त्या विमान प्रवासात एकटं असल्यानं आर माधवनला थोडं उदास वाटत होतं. त्यानं हा व्हिडिओ त्याच्या इंस्टावरुन शेयर केला आहे. त्याला लाईक्स आणि कमेंट्सही मिळाल्या आहेत. आपण एकट्यानं करत असलेला हा प्रवास म्हणजे एखाद्या भुत बंगल्यात राहण्याचं फिलिंग असल्याचंही त्यानं यावेळी सांगितलं. त्या व्हिडिओ कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं आहे की, 26 जुलै 2021 हे माझ्यासाठी खूपच मनोरंजक स्वरुपाचं होतं. मी तेव्हा देवाजवळ प्रार्थना करत होतो की, हा प्रवास लवकरच संपावा.

अख्ख्या विमानात एकटाचं: भुत बंगल्यासारखं वाटलं, आर माधवनचा अनुभव
आरोग्यासाठी गुणकारी 5 प्रकारचे चहा; एकदा पिऊन पाहा

आर माधवन तेव्हा दुबईला एका शुटिंगसाठी चालला होता. कोरोनामुळे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात किती मोठ्या प्रमाणात बदल झाला हे त्यावेळी आपल्याला कळून आलं. आर माधवनच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचं झाल्यास तो त्याच्या रॉकेट्री द नंबी इफेक्ट नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्यात त्यानं नंबी नारायणन यांची भूमिका साकारली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com