esakal | 'माझ्याकडे शब्दच नाहीत', मिराबाई चानूच्या व्हायरल फोटोवर माधवनची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

r madhvan

'माझ्याकडे शब्दच नाहीत', मिराबाई चानूच्या व्हायरल फोटोवर माधवनची प्रतिक्रिया

sakal_logo
By
स्वाती वेमूल

मिराबाई चानू सैखोम Mirabai Chanu हिने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. ४९ किलो वजनी गटात तिने रौप्यपदक जिंकत देशाची मान उंचावली. या विजयाने मिराबाईने ऑलिम्पिकमध्ये भारताचं खातं उघडलं होतं. एकीकडे देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे तिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती जमिनीवर बसून जेवताना दिसत आहे. अनेकांनी हा फोटो पाहिल्यानंतर मिराबाईच्या कौटुंबिक परिस्थितीबाबत कमेंट्स केल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता आर. माधवनलाही R Madhavan मिराबाईचा हा फोटो पाहून धक्का बसला आहे. त्यानेसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो शेअर करत ट्विट केलं आहे. (R Madhavan comment on seeing Olympian Mirabai Chanu eat on floor at home slv92)

'हे खरं असू शकत नाही. मी नि:शब्द झालोय', असं ट्विट माधवनने केलं आहे. या फोटोमध्ये मिराबाई किचनमध्ये जमिनीवर बसून इतर दोघांसोबत जेवताना दिसतेय. या फोटोवर कमेंट करत अनेकांनी खेळाडूंच्या कौटुंबिक परिस्थितीबाबत सरकार काहीच का करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. मीराबाई चानूने ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावल्यानंतर भारतीयांचे आणि कुटुंबीयांचे आभार मानले. आईने खूप मोठा त्याग केला आणि माझ्यावर विश्वास ठेवला. देशासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याचा खूप आनंद झाला असल्याचं चानूने म्हटलं होतं. रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये चानूची निराशा झाली होती. मात्र त्यानंतर चानूने कामगिरी सुधारत 2017 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आणि 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं होतं.

हेही वाचा: 'मेडल जिंकलो तरच भारतीय नाही तर नेपाळी, चायनीज'; मिलिंदच्या पत्नीचं ट्विट

भारताकडून ऑलिम्पिक मेडल जिंकणारी ती फक्त दुसरी वेटलिफ्टर ठरली आहे. याआधी कर्णम मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलं होतं. मीराबाई चानूला मागे टाकत चीनच्या होऊ झिऊईने एकूण 2010 किलो वजन उचलत सुवर्ण पदक पटकावलं. तर इंडोनेशनियाची एसाह विंडी कांटिका ही 194 किलोसह तिसऱ्या स्थानी राहिली.

loading image
go to top