Rocketry Trailer : उलगडणार शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांचा जीवनप्रवास

rocketry
rocketry

या नवीन वर्षात बॉलिवूडमध्ये काही वेगळ्या विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यातीलच एक म्हणजे 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट'. भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित या चित्रपटात अभिनेता आर. माधवन मुख्य भूमिका साकारत असून त्यानेच या चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा केलं आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून माधवन या चित्रपटाच्या कथेवर काम करत होता. अखेर या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. इंग्रजी, हिंदी आणि तामिळ या तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरच्या पहिल्याच दृश्यात आर. माधवनसोबत अभिनेता शाहरुख खान दिसून येतो.

 नंबी नारायणन यांना १९९४ मध्ये हेरगिरी प्रकरणात अटक करण्यात आली होती. नंबी यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमाबाबतचे गोपनीय दस्तऐवज परकीयांच्या स्वाधीन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याच कथेची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. आर. माधवनच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. 

नंबी यांच्यासारखा हुबेहूब लूक करण्यासाठी माधवननं अडीच वर्षे घेतली मेहनत 
ट्रेलरमध्ये माधवनचा लूक हुबेहूब नंबी नारायणन यांसारखा पाहायला मिळतोय. यासाठी त्याने जवळपास अडीच वर्षे मेहनत घेतली आहे. "मी साकारत असलेल्या भूमिकेचं वय ७०-७५ वर्षे आहे, म्हणून माझ्यासाठी हे सर्वांत मोठं आव्हान आहे. म्हणून मला अडीच वर्षे लूकवर मेहनत घ्यावी लागली. मी जेव्हा पहिल्यांदा मेकअप करून सेटवर गेलो तेव्हा नंबी सरांना हसूच अनावर झालं होतं. सेटवर मी आणि नंबी सर हुबेहूब दिसत होतो. त्यामुले अनेकांचा गोंधळ उडायचा", असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com