बर्थ डे स्पेशल: 'या' चमत्कारामुळे ए आर रहमानने स्विकारला इस्लाम धर्म, नावाचाही आहे खास किस्सा

दिपाली राणे-म्हात्रे
Wednesday, 6 January 2021

रहमान यांचं खरं नाव दिलीप कुमार होतं जे त्यांना आवडत नव्हतं. रहमान नेहमी म्हणायचे के त्यांचं हे नाव बदललं जावं मात्र त्यांना तशी संधी मिळत नव्हती.

मुंबई- बॉलीवूडमध्ये गीतकार  आणि संगीतकारांची काही कमी नाही. उलट इथे असे एकापेक्षा एक गायक आहेत ज्यांच्या आवाज आणि संगीताने ऐकणारा मंत्रमुग्ध होऊन जातो. यातलाच एक आवाज असा आहे जो थेट हृदयाला भिडतो आणि ज्याचं संगीत मनःशांती मिळवून देतं. होय आम्ही बोलतोय ते ते संगीतकार ए आर रहमान यांच्याविषयी ज्यांनी देश-विदेशात भारतीय संगीत पोहोचवलं. आज ६ जानेवारी रोजी ए आर रहमान त्यांचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेूऊया त्यांच्या आयुष्यातील काही खास घडामोडी

हे ही वाचा: मलाईका अरोराने स्विमिंग पुलमध्ये केला योगा, सोबत फायदेही सांगितले 

संगीताप्रती रहमान यांची एवढी निष्ठा आहे की त्यांचे केवळ देशात नाहीत तर विदेशातही लाखो चाहते आहेत. त्यांच्या प्रतिभेला मिळालेली सर्वात मोठी पोचपावती म्हणजे रहमान यांनी आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसोबतंच जगातील सगळ्यात मोठ्या प्रसिद्ध ऑस्कर पुरस्काराने सन्मामित केलं गेलं आहे. ६ जानेवारी १९६६ रोजी जन्मलेल्या रहमान यांचं पूर्ण नाव अल्लाह रक्खा रहमान असं आहे. मात्र त्यांचं खरं नाव दिलीप कुमार होतं जे त्यांना आवडत नव्हतं. रहमान नेहमी म्हणायचे के त्यांचं हे नाव बदललं जावं मात्र त्यांना तशी संधी मिळत नव्हती.

रहमान यांना त्यांच्या वडिलांकडून संगीताचा वारसा मिळाला होता. रहमान जेव्हा ९ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या जाण्याने त्यांच्या घरात इतकी गरिबी आली की त्यांना घरातील वाद्ययंत्र विकावी लागली होती. मात्र रहमान यांच्या आईचा सूफी संत पीर करीमुल्लाह यांच्यावर पूर्ण विश्वास होता. हिंदू धर्मावर देखील तिचा भरपूर विश्वात होता. रहमान यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की वडिलांच्या निधनानंतर जवळपास १० वर्षांनी ते कादरी साहेबांना भेटण्यासाठी गेले. त्यावेळी रहमान यांच्या आईने त्यांची खूप सेवा केली होती.

AR Rahman's mother Kareema Begum passes away in Chennai

पुढे रहमान म्हणाले, 'मला समजलं की पुढे जाण्यासाठी एक मार्ग निवडायला लागेल आणि तो म्हणजे सुफीवादाचा मार्ग.' संगीत त्याच्या नसानसात होतं आणि यासाठी त्यांनी सूफी इस्लाम धर्म स्विकारण्याचा निर्णय घेतला. एकदा रहमान ज्योतिषीकडे गेले असता त्यांना ज्योतिषीने सांगितलं की तू तुझं नाव अब्दुल रहमान किंवा अब्दुल रहीम ठेव. रहमान यांच्या आईला वाटत होतं की त्याच्या नावात अल्लाह रक्खा जरुर असावं. त्यावेळी त्यांना रहमान हे नाव आवडलं आणि मग त्यांनी त्यांच नाव ए आर रहमान केलं. आज हे नाव संपूर्ण जगात लोकप्रिय आहे.  

a r rahman birthday special story the composer chose sufism religion and changed his name  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a r rahman birthday special story the composer chose sufism religion and changed his name