'वतन के आगे कुछ नहीं..मै भी नहीं' - Raazi ट्रेलर

मंगळवार, 10 एप्रिल 2018

भारतातले एक काश्मिरी वडील आपल्या मुलीला गुप्तहेरी करण्यासाठी तिचे लग्न करून पाकिस्तानात पाठवतात. जिला यासंबंधी काही माहिती नसते. तेथील सर्व खाजगी व महत्त्वाची माहिती भारताला पुरविण्याचे काम तिच्याकडे असते. भारताचे कान व डोळे बनून राहण्याची सूचना तिला दिली जाते.

मुंबई : बबली अभिनेत्री आलिया भट ही कायम वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडण्यात अग्रेसर आहे. आता ती दिसणार आहे अॅक्शन थ्रिलर भूमिकेत. 'राझी' या सिनेमाच्या नुसत्या ट्रेलरनेच प्रेक्षकांना मोहिनी घातली आहे. आलिया या सिनेमात गुप्तहेराच्या भूमिकेत दिसेल. आलिया सहमत असे तिच्या भूमिकेचे नाव आहे.  

‘जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रोडक्शन्स’ची निर्मिती असलेला 'राझी' हा देशभक्तीवरचा सिनेमा असला, तरी त्याचे कथानक हे हटके आहे. भारतातले एक काश्मिरी वडील आपल्या मुलीला गुप्तहेरी करण्यासाठी तिचे लग्न करून पाकिस्तानात पाठवतात. जिला यासंबंधी काही माहिती नसते. तिच्या पतीची भूमिका विकी कौशल या अभिनेत्याने साकारली आहे. तो पाकिस्तानी अधिकारी असतो. तेथील सर्व खाजगी व महत्त्वाची माहिती भारताला पुरविण्याचे काम तिच्याकडे असते. भारताचे कान व डोळे बनून राहण्याची सूचना तिला दिली जाते. त्याप्रमाणे ती पुढील कारवाया कशा करते हे सिनेमातच बघणे औत्सुक्याचे ठरेल.

राझीच्या ट्रेलरमधला 'वतन के आगे कुछ नहीं..मै भी नहीं' हा डायलॉग सध्या चांगलाच गाजतोय. 

raazi

ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे. हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या कादंबरीवरून या राझी या सिनेमाचे कथानक घेतले आहे. दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी नेहमीप्रमाणे एक उत्तम सिनेमा द्यायचा प्रयत्न केला आहे हे या ट्रेलरवरून कळते. या आधी त्यांनी 'तलवार' सारखा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाचे चित्रीकरण कश्मीर, पंजाब आणि मुंबईमध्ये झाले असून येत्या ११ मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raazi movie trailer launch