राधिकाप्रमाणे 'या' अभिनेत्रींचेही सेक्स सीन झाले आहेत लीक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जुलै 2019

प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या आयुष्यावर बेतलेल्या रंगरसिया सिनेमातील रणदीप हुड्डा आणी नंदना सेन यांचा एक बोल्ड सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या सीनमुळेच सिनेमा प्रचंड चर्चेत आला होता. या सीननंतर सिनेमातील अनेक बोल्ड सीनही लीक झाले होते. असेही बोलले जाते की चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी जाणीवपूर्वक हे सीन लिक करण्यात आले होते.

मुंबई : प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या आयुष्यावर बेतलेल्या रंगरसिया सिनेमातील रणदीप हुड्डा आणी नंदना सेन यांचा एक बोल्ड सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या सीनमुळेच सिनेमा प्रचंड चर्चेत आला होता. या सीननंतर सिनेमातील अनेक बोल्ड सीनही लीक झाले होते. असेही बोलले जाते की चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी जाणीवपूर्वक हे सीन लिक करण्यात आले होते.

Image may contain: 2 people, people sitting

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री राधिका आपटेच्या आगामी सिनेमातील एक इंटीमेट सीन लीक झाला. या सीनचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही गोष्ट जेव्हा राधिकाला कळली तेव्हा तिने लोकांच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केले. सिनेमात बाकीही अनेक चांगले सीन आहेत, पण ते लीक न होता फक्त इंटीमेट सीनच लीक झाला. यातून लोकांची मानसिकता दिसते असं स्पष्ट सांगितलं. यावरून मोठा वादही झाला होता.

Image may contain: one or more people and people sitting

या सीनमध्ये देव पटेलही आहे, मात्र हा सीन त्याच्या नावाने नाही तर माझ्याच नावाने व्हायरल होत आहे. फक्त राधिकाच नाही तर याआधीही अनेक अभिनेत्रींचे सिनेमातील इंटीमेट सीन लीक झाले आहेत. लिपस्टिक अण्डर माय बुर्खामधील अभिनेत्री अहाना कुमराचा इंटीमेट सीनही लीक झाला होता.

Image may contain: 1 person, close-up

फक्त, अहानाच नाही तर सिनेमातील इतर अभिनेत्रींचे बोल्ड सीन लीक झाले होते. तसेच, साहेब बीवी और गँगस्टर सिनेमातील अभिनेत्री माही दिल आणि रणदीप हुड्डा यांचा इंटीमेट सीन लीक झाला होता. अनारकली ऑफ आरा सिनेमातील अभिनेत्री स्वरा भास्करचा एक सीन लीक झाला होता. यात स्वरा आपले कपडे बदलताना दिसत होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: radhika apte and bollywood actress intimate scene leaked on internet