त्या बोल्ड सीनवर राधिका म्हणाली....

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जुलै 2019

‘द वेडिंग गेस्ट’च्या जोरदार प्रमोशनमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्याचबरोबर देव आणि राधिकाच्या एका बोल्ड सीनचीही चर्चा होतीये.

स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील देव पटेल आणि स्टनिंग अभिनेत्री राधिका आपटे आता ‘द वेडिंग गेस्ट’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच देव आणि राधिका स्क्रिन शेअर करतील. या चित्रपटात एका ब्रिटीश मुस्लीम मुलाचा म्हणजेच देव पटेलचा पाकिस्तान ते भारत असा प्रवास दाखवण्यात येणार आहे.

‘द वेडिंग गेस्ट’च्या जोरदार प्रमोशनमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्याचबरोबर देव आणि राधिकाच्या एका बोल्ड सीनचीही चर्चा होतीये. चित्रपटापूर्वीच हा सीन लिक झाला आहे. पण ही चर्चा 'राधिकाचा बोल्ड सीन' म्हणून व्हायरल झालाय. यावर तिने आक्षेप घेतला.

Radhika Apte talks about her and Dev Patel s Bold scene

बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार राधिकाला या बोल्ड सीन लीक होण्याबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर तिच्यासोबत देव असतानाही हा सीन ‘राधिकाचा बोल्ड सीन’ म्हणून का चर्चेत आहे ? असा प्रश्न राधिकानेच उपस्थिच केला. ‘द गेस्ट वेडिंग या चित्रपटात आणखी खूप सुंदर सीन आहेत. परंतु लोकांच्या मानसिकतेमुळे फक्त बोल्ड सीन लीक झाला आहे. या सीनमध्ये माझ्यासोबत देव पटेल देखील आहे. पण सीन माझ्या नावानेच लीक होत आहे. पुरुष अभिनेता देव पटेल याच्या नावाखाली हा सीन का लीक झाला नाही’ असे प्रश्न राधिकाने उभा केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radhika Apte talks about her and Dev Patel s Bold scene