
Swara Bhaskar च्या रिसेप्शनला पोहोचले राहुल गांधी, सर्वांसोबत हसत खेळत केली धम्माल, Video बघाच
Rahul Gandhi Video On Swara Bhaskar Wedding Reception: बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने काही दिवसांपूर्वीच आपला बॉयफ्रेंड फहाद अहमद सोबत कोर्ट मॅरेज केलं होतं. कोर्ट मॅरेज केल्यानंतर अभिनेत्रीनं अगदी पारंपरिक हिंदू पद्धतीनं लग्न केलं आहे.
तिच्या लग्नाचे आणि प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच स्वराने तिच्या निकटवर्तीयांसाठी खास रिसेप्शन आयोजित केलं होतं. या रिसेप्शनला काँग्रेस प्रमुख राहुल गांधी उपस्थित होते.
(rahul gandhi attend swara bhaskar wedding reception, video viral)
राहुल गांधी यांचा एक विडिओ विरल भयानीने व्हायरल केलाय. या व्हिडिओत राहुल गांधी यांची स्वरा भास्करच्या वेडिंग रिसेप्शनला ग्रँड एंट्री झाली. राहुल गांधी त्यांच्या नेहमीच्या पांढऱ्या सदऱ्यात रिसेप्शनला उपस्थित होते.
रिसेप्शनमध्ये राहुल गांधी यांचा खेळकर स्वभाव दिसून आला. उपस्थित पाहुण्यांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. आणि हसत खेळत रिसेप्शनमध्ये त्यांचा खास अंदाज दाखवला. दिल्लीतील एअर फोर्स सभागृहात स्वराचा शाही रिसेप्शन सोहळा पार पडला.
स्वराचे राहुल गांधी यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत स्वरा त्यांच्यासोबत सहभागी होती.
गुलाबी आणि लाल रंगाची छटा असलेल्या ड्रेसमध्ये स्वरा भास्कर रिसेप्शनला उपस्थित होती. याशिवाय तिचा नवरा फहाद अहमदने शेरवानी परिधान केली होती.
गुपचूप कोर्ट मॅरेज केल्यानंतर स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी जवळचेच काही नातेवाईक आणि मित्र-परिवार यांच्या उपस्थितीत आपलं पारंपरिक लग्न केलं आहे. या लग्नाचे फोटो स्वरा भास्करनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत शेअर केले आहेत.
त्याआधी स्वरा भास्करचा प्री-वेडिंग सोहळा १२ मार्च रोजी पार पडला,ज्यात हळदी समांरभ आणि मेहेंदी काढण्याचे कार्यक्रम सामिल होते. दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा होता..याशिवाय तिच्या लग्नाची सप्तपदी देखील पार पडली आहे.
पुढे १५ मार्च रोजी एक श्रवणीय कव्वाली समारंभ संपन्न झाला. त्या समांरभात देखील जवळचे कुटुंबिय आणि मित्रपरिवार सामिल होईल.