esakal | राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याचं 'पॉर्न' संबंधीचं जुनं ट्वीट व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

Shilpa Shetty and Raj Kundra

राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याचं 'पॉर्न' संबंधीचं जुनं ट्वीट व्हायरल

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती राज कुंद्राला (Raj kundra) काल रात्री पॉर्नोग्राफीक (pornagraphick case) प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai police) अटक केली. त्याच्या अटकेनंतर राज कुंद्राने नऊ वर्षापूर्वी केलेलं एक टि्वट आता व्हायरल होत आहे. पॉर्न विरुद्ध वेश्याव्यवसाय अशा प्रकारचं ते टि्वट राज कुंद्राने केलं होतं. (Raj Kundras 9 year old tweet on Porn vs Prostitution goes viral after arrest dmp82)

"एखाद्याला कॅमेऱ्यासमोर सेक्स करण्यासाठी पैसे देणं कसं कायदेशीर ठरु शकतं? आणि दुसरा मार्ग कसा बेकायद आहे?" असा सवाल राज कुंद्राने २९ मार्च २०१२ रोजी एका टि्वटमधून विचारला होता. त्यानंतर ३ मे २०१२ रोजी केलेल्या दुसऱ्या एका टि्वटमध्ये त्याने "भारतात अभिनेते क्रिकेट खेळतायत, क्रिकेटर्स राजकारण खेळतायत, राजकारणी पॉर्न बघतायत आणि पॉर्न स्टार्स अभिनेत्री होतायत" अशा प्रकारचे वादग्रस्त टि्वट केले होते.

हेही वाचा: बकरी ईद: 300 जनावरांच्या कत्तलीला मुंबई पालिकेची परवानगी

नेटीझन्स आता या जुन्या टि्वटवरुन राज कुंद्राची फिरकी घेतायत. राज कुंद्रा आता मुंबई पोलिसांबरोबर डिबेट करत असेल, असे एका युझरने म्हटले आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) अटकेमुळे चर्चेत आला आहे. काल रात्री त्याला पॉर्न फिल्म रॅकेट (porn film racket) प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai police) अटक केली. राज कुंद्रा हाच या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार असल्याचा आरोप आहे.

हेही वाचा: मुंबई: डिपॉझिटच्या पैशातून शाळा चालवत रफिक यांनी ६६० विद्यार्थ्यांना दिली फी माफी

"पॉर्नोग्राफीक चित्रपट बनवून काही अ‍ॅप्सवर प्रदर्शित केले जात असल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे फेब्रुवारी २०२१ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. आम्ही राज कुंद्राला १९-७-२०२१ रोजी अटक केली. तोच या प्रकरणात मुख्य कारस्थानकर्ता आहे" असे मुंबई पोलिसांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

राज कुंद्राविरोधात फसवणूक कलम (४२०), (३४) (२९२), (२९३) अश्लील, असभ्य जाहीरात या आयपीसीच्या कलमातंर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

loading image