Raj Thackeray : मराठी भाषा गौरवदिनी राज ठाकरेंकडून संकल्प जाहीर; लतादीदींच्या जयंतीदिनी.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

Raj Thackeray : मराठी भाषा गौरवदिनी राज ठाकरेंकडून संकल्प जाहीर; लतादीदींच्या जयंतीदिनी....

Raj Thackeray : आज मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचीही मागणी केली जात आहे.

हेही वाचा : डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

या सर्वामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ते काम करत असलेल्या संकल्पनेचं गुपित जाहीर केले आहे. ते नवी मुंबईत मराठी दिनी निमित्त आयोजित एका मुलाखतीत बोलत होते.

राज ठाकरेंना मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा संग्रह आहे. त्यांना विविध विषयांवरील पुस्तकं वाचण्यास आवडतात हे सर्वांनाच माहितीआहे. विदेशात कॉफी टेबल बुकचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात आहे. हा ट्रेंडआता मराठीतही येणार आहे.

याची सुरूवात राज ठाकरें स्वतः करणार असून, त्यासाठीचे काम सुरू असल्याचे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.

आपण सध्या गानसम्राज्ञी लता दीदींच्या पुस्तकावर काम करत असून, दीदींच्या जयंतीला म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी हे पुस्तक प्रकाशित करण्याचा मानस आहे.

या पुस्तकावर दीदींची भाच्ची रचना शहा, अंबरीश मिश्रा यांच्यासह अनेक मंडळी या प्रोजेक्टवर काम करत असल्याचे राज म्हणाले.

हे पुस्तक फोटो बायोग्राफ्री किंवा नेमक्या कोणत्या स्वरूपात असेल यावर राज ठाकरेंकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नसून, हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतरच नेमकं कसं असेल हे कळेल असे म्हणत राज ठाकरेंनी पुस्तकाबाबतचं गुपित कायम ठेवले आहे.

व्यंगचित्रांमुळे वाढलं वाचन

भाषेने तुम्ही ओळखले जातात. त्यामुळे भाषा ही तुमची ओळख असल्याचे राज ठाकरे म्हणाले. व्यंगचित्रामुळे माझं वाचन वाढल्याचे राज ठाकरे म्हणाले. इंदिरा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, ऐतिहासिक लेखन वाचायला आवडतं असेदेखील राज यांनी यावेळी सांगितले. याशिवाय शिवरायांचे चरित्र वाचायला आवडत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. 

निवडणूक आयोगाच्या निकालावर काय म्हणाले राज ठाकरे

यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आणि निवडणूक आयोगाच्या निकालाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी त्याला थेटपणे उत्तर दिलं आहे.

राज ठाकरे म्हणाले की, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो आहे. राज्यातल्या सत्तासंघर्षावर आणि निवडणूक आयोगातील निर्णयावर येत्या २२ तारखेला भाष्य करेन त्यामुळे आत्ता ट्रेलर, टिझर काहीही नाही. थेट २२ तारखेला सिनेमा दाखवतो, असं राज ठाकरे म्हणाले.

निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य असला तरी भविष्यात असे निर्णय नको, अशीच भूमिका राज ठाकरे मांडणार असा अंदाज बांधला जात आहे.