
Raj Thackeray: बाळासाहेबांचं स्वप्न ना उद्धवने पूर्ण केलं ना शिंदेंनी.. राज ठाकरे स्पष्टच बोलले..
Avdhoot Gupte show khupte tithe gupte : गेले दोन दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे भलतेच चर्चेत आहे. ही चर्चा सुरू झाली ती त्यांच्या आगामी मुलाखतीमुळे. राज ठाकरे 'खुपते तिथे गुप्ते' मुलाखतीच्या पहिल्या पहिल्या भागात हजेरी लावणार आहेत.
हा भाग आज प्रक्षेपित होणार असून या मुलाखतीचे अनेक प्रोमो व्हायरल होत आहे. यातीलच एका प्रोमो मध्ये राज ठाकरे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुख्यमंत्री पदावरून झालेला संग्राम, बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न याविषयी सडेतोड पणे बोलले आहे. हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे.
(Raj Thackeray talks about balasaheb thackeray dream shivsena CM uddhav thackeray and eknath shinde on khupte tithe gupte show)
गायक, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक अशा विविध भूमिका पार पडणारा अवधूत गुप्ते लवकरच आपल्या भेटीला त्याचा 'खुपते तिथे गुप्ते' हा शो घेऊन येत आहे. या शो ची बरीच चर्चा आहे.
जवळपास 10 वर्षांनी हा मुलाखतीचा कार्यक्रम पुन्हा आला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात महाराष्ट्रातील एक मोठी राजकीय आसामी 'खुपते तिथे गुप्ते' मध्ये हजेरी लावणार आहे. ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे..
याच मुलाखतीचा एक प्रोमो खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
अवधूत गुप्ते, राज ठाकरे यांना विचारतो की, ''गेल्या चार वर्षात शिवसेनेच्या दोन मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दोन्ही मुख्यमंत्री आज बाळसाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं असं सांगत आहेत. तर तुम्हाला नेमकं कोणत्या शपथविधीच्या वेळी बाळसाहेबांचं स्वप्न साकार झाल्यासारखं वाटलं.. उद्धव ठाकरेंच्या की एकनाथ शिंदेंच्या..'
या प्रश्नावर राज ठाकरे यांनी दिलेल्या उत्तराने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहेत. राज ठाकरे म्हणाले, 'एकाच्याही नाही.. मुख्यमंत्री आणि शपथ घेणं हे बाळसाहेबांचं स्वप्न कधीच नव्हतं. महाराष्ट्राला जाग येणं महाराष्ट्र पुन्हा पाहिल्यासारखा बलशाली होणं हे त्यांचं स्वप्न होतं..' असं अत्यंत परखड भाष्य यावेळी राज ठाकरे यांनी केलं. या विधानाची साध्या बरीच चर्चा आहे.