Raj Thackeray: राज ठाकरे लावणार थेट छत्रपती शिवाजी महाराजांना फोन..! कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray will call chhatrapati shivaji maharaj on khupte tithe gupte show zee marathi

Raj Thackeray: राज ठाकरे लावणार थेट छत्रपती शिवाजी महाराजांना फोन..! कारण...

Avdhoot Gupte show khupte tithe gupte : गायक, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक अशा विविध भूमिका पार पडणारा अवधूत गुप्ते लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. सध्या त्याच्या 'खुपते तिथे गुप्ते' या नव्या शो ची बरीच चर्चा आहे.

अवधूत 'झी' मराठी वर एक दमदार मुलाखतीचा कार्यक्रम घेऊन येत आहे. 'खुपते तिथे गुप्ते' असे या शो चे नाव असून हे या कार्यक्रमाचे दुसरे पर्व आहे. जवळपास 10 वर्षांनी हा कार्यक्रम पुन्हा आला आहे.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात महाराष्ट्रातील एक मोठी राजकीय आसामी 'खुपते तिथे गुप्ते' मध्ये हजेरी लावणार आहे. ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे.. आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

(Raj Thackeray will call chhatrapati shivaji maharaj on khupte tithe gupte show zee marathi)

'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचे आधीचे पर्व ही प्रचंड गाजले होते. अनेक दिग्गजांची मुलाखत त्यावेळी पाहायला मिळाली होती. आता दहा वर्षांनी हा शो परत एकदा येणार असून सगळ्यांची गुपित उलगडणार असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

या कार्यक्रमातील एक अविभाज्य भाग म्हणजे येणाऱ्या व्यक्तीने आपल्या मनातल्या एका व्यक्तीला फोन लावणे. हा प्रसंग अत्यंत भावनिक असतो. अशातच राज ठाकरे कुणाला फोन लावणार याची उत्सुकता सर्वांना होती.

नुकताच या भागाचा प्रोमो रिलीज झाला आहे. ज्यामध्ये राज ठाकरे थेट छत्रपती शिवाजी महाराजांना फोन लावणार असल्याचे ते सांगतात.

यावेळी अवधूत विचारतो, हा जादूचा फोन आहे.. जो तुमच्या मनातल्या व्यक्तीला थेट कनेक्ट होतो. त्यावर राज ठाकरे म्हणतात ''मला छत्रपती शिवाजी महाराजांना फोन लावायचा आहे. आणि माझी खूप इच्छा आहे की त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवतरवावं आणि इथल्या मराठी माणसांना सांगावं की तुम्ही कशासाठी इतके झगडलात..''

हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. आता राज ठाकरे नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांशी कॉल करून काय बोलणार , याची सर्वचजन वाट पाहत आहेत.