त्यावेळी मी 'काका'ला फार भाव दिला नव्हता - हेमा

रविवार, 29 ऑक्टोबर 2017

अभिनेते राजेश खन्ना यांच्याबद्दल बोलताना हेमा म्हणाल्या, मी त्यांच्यासोबत 1971 मध्ये अंदाज केला. त्यावेळी मी नवी होते. पण काका सुपरस्टारपदी विराजमान होते. अनेक मुली त्यांच्यावर मरत होत्या. मी जेव्हा सिनेमा करायला आले तेव्हा माझ्याशी ते फारच विचित्र वागत होते. कदाचित, त्यांना मिळणारा भाव मी त्यांना देत नव्हते. एक सहकलााकार म्हणून जी वागणूक मी द्यायला हवी, तेवढीच मी देत होते. पण त्यामुळे सुपरस्टार राजेश खन्ना यांना ते आवडलं नसावं.'

मुंबई : एकिकडे हाॅलिवूडमध्ये हार्वे आणि टोबॅकची प्रकरणं चर्चेत आहेत. तिकडे होणाऱ्या लैंगिक शोषणावर सातत्याने बोललं जातंय. काही दिवसांपूर्वी आलेल्या #Metoo ने तर हाॅलिवूडसह हिंदी इंडस्ट्रीतील कास्टिंग काउच चव्हाट्यावर आणलं. आज अभिनेत्री हेमा मालिनी यांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी सांगितलेल्या एका आठवणीने त्यावेळी सुपरस्टार पदी विराजमान असणाऱ्या राजेश खन्ना अर्थात काका यांचं स्टारपद अधोरेखित होतंच. पण त्यांचं स्वत: वर असलेलं प्रेमही लक्षात येतं. एक नक्की की या आठवणीने 1070 ते 80 च्या दशकात शोषणाचा प्रकार फार नव्हता असं हेमा मालिनी सांगतात. 

अभिनेते राजेश खन्ना यांच्याबद्दल बोलताना हेमा म्हणाल्या, मी त्यांच्यासोबत 1971 मध्ये अंदाज केला. त्यावेळी मी नवी होते. पण काका सुपरस्टारपदी विराजमान होते. अनेक मुली त्यांच्यावर मरत होत्या. मी जेव्हा सिनेमा करायला आले तेव्हा माझ्याशी ते फारच विचित्र वागत होते. कदाचित, त्यांना मिळणारा भाव मी त्यांना देत नव्हते. एक सहकलााकार म्हणून जी वागणूक मी द्यायला हवी, तेवढीच मी देत होते. पण त्यामुळे सुपरस्टार राजेश खन्ना यांना ते आवडलं नसावं.'

आता हेमा मालिनी यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांचं लक्ष डिंपल, ट्विंकल खन्ना यांच्याकडे वळलं आहे. कारण राजेश खन्ना यांच्या काळात डिंपल आली. बाॅबीद्वारे लोकांच्या मनात ठसली आणि तिने पुढे राजेश ख्नन्ना यांच्यासोबत विवाह केला. 

Web Title: rajesh khanna hema malini movie andaz esakal news

टॅग्स