राजेश मापुसकर करणार मालिकेच्या शीर्षक गीताचे दिग्दर्शन!

सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

कलर्स मराठीवर लवकरच राधा प्रेम रंगी रंगली ही नवी मालिका सुरु होणार आहे. मालिकेद्वारे तब्बल १३ वर्षांनंतर सचित पाटील छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून वीणा जगताप नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. मालिकेचे प्रोमोज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून मालिका सुरु होण्यापूर्वीच कथेबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात आहे.
 

मुंबई : कलर्स मराठीवर लवकरच राधा प्रेम रंगी रंगली ही नवी मालिका सुरु होणार आहे. मालिकेद्वारे तब्बल १३ वर्षांनंतर सचित पाटील छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून वीणा जगताप नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. मालिकेचे प्रोमोज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून मालिका सुरु होण्यापूर्वीच कथेबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात आहे.

राधा प्रेम रंगी रंगली ही मालिकेची कथा राधा आणि प्रेमभोवती केंद्रित असून ही प्रेमकथा असणार आहे. सध्या हिंदी सिनेमासृष्टीतील बरेचसे गायक मराठीतील मालिकांचे शीर्षक गीत गात आहेत. पिंगा, समझावा, राधा असं म्हणत संपूर्ण भारताला वेड लावणारी गायिका श्रेया घोषाल राधा प्रेम रंगी रंगली हिने या मालिकेचे शीर्षक गीत म्हंटले आहे. तसेच महाराष्ट्राच्या लाडक्या स्वप्नील बांदोडकरनेदेखील श्रेयाला उत्तम साथ दिली आहे. शीर्षक गीत सुंदर झालेच असून त्याला अजून सुंदरप्रकारे प्रेक्षकांच्या समोर सादर करण्याची जबाबदारी घेतली आहे व्हेंटिलेटरसारखा उत्कृष्ट चित्रपट बनविणाऱ्या आणि राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित लेखक आणि दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी ! या मालिकेच्या दिग्दर्शनाच्या निमित्ताने राजेश मापुसकर यांची छोट्या पडद्यावर एन्ट्री होणार आहे.

राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेच्या शीर्षक गीताला राजेशजींची एक वेगळीच दृष्टी लाभली आहे. मालिकेच्या शीर्षक गीतामध्ये भव्यता, नाविन्यता तर आहेच पण ‘प्रेम’ या भावनेला एका वेगळ्या आणि कलरफुल पद्धतीने राजेश मापुसकर प्रेक्षकांच्या समोर सादर करणार आहेत हे नक्की. राधा प्रेमच्या प्रेमामध्ये रंगली हे प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी केलेला रंगाचा सुंदर उपयोग, राधाचे स्वप्नमय जग आणि त्यामध्ये असणारा प्रेम चा वावर, प्रेमने राधाला हळूच रंग लावणे, आणि मग राधा संपूर्णपणे त्या रंगामध्ये न्हाऊन जाणे हा क्षण खूप सुंदर आणि रोमांटिक रीत्या राजेशजींनी त्या गाण्यामध्ये दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. मालिकेच्या शीर्षक गीतामध्ये प्रेक्षकांची भेट राधा आणि प्रेम बरोबरच मालिकेमधील इतर कलाकारांसोबत देखील होणार आहे.

राजेश मापुसकर या शीर्षक गीताबद्दल बोलताना म्हणाले की, “राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेच्या शीर्षक गीताचे दिग्दर्शन करणे म्हणजे माझ्यासाठी एक आव्हान होते. जेंव्हा कलर्स मराठीने या मालिकेच्या शीर्षक गीताचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली तेंव्हा मी जरा घाबरलो कारण प्रेम गीत वा “प्रेम” ही भावना शूट करण्याची हि माझी पहिलीच वेळ होती, याआधी मी कधीच romantic गाणं वा चित्रपट शूट केलेले नाही. पण मी या मालिकेच्या शीर्षक गीताबद्दल खूप उत्सुक आहे. चित्रपटानंतर मालिकेच्या शीर्षक गीताकडे वळण्याचे एकमेव कारण निखील साने कारण ते नेहेमीच एक वेगळी संकल्पना घेऊन माझ्याकडे येतात आणि मला त्यांच्या दृष्टीकोनावर पूर्ण विश्वास आहे.
कलर्स मराठीवर सुरु होणाऱ्या ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेचे शीर्षक गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: rajesh mapuskar directing new song colors marathi esakal news