राजेश मापुसकर दिग्दर्शित करणार गांधी हत्येवरची वेब सिरीज

गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

याविषयी बोलताना लगे रहो मुन्नाभाई चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच गांधींजींच्या विचारांचा प्रभाव आपल्यावर असल्याचं म्हणत, ही सिरिज दिग्दर्शित करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही राजेश मापुसकर म्हणाले. केवळ दिग्दर्शनचं नव्हे तर सहनिर्मितीची धुरा ही राजेश मापुसकर सांभाळणार आहेत. तर या सिरिजची निर्मिती अबंडेंटिया एन्टरटेनमेंट करणार आहे.

मुंबई : फरारी की सवारी चित्रपटातून हिंदी तर व्हेंटिलेटर चित्रपटातून मराठी दिग्दर्शनात पदार्पण करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुसकर आता गांधी हत्येसंदर्भातील वेब सिरिज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. या वेब सिरिजमध्ये मनोहर मालगावकर लिखित दि मेन हू किल्ड गांधी (The Men who killed Gandhi) या पुस्तकात उल्लेखलेल्या घटना आणि गांधींच्या हत्येवेळी भारतातील परिस्थिती यांचं चित्रण असणार आहे.

याविषयी बोलताना लगे रहो मुन्नाभाई चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच गांधींजींच्या विचारांचा प्रभाव आपल्यावर असल्याचं म्हणत, ही सिरिज दिग्दर्शित करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही राजेश मापुसकर म्हणाले. केवळ दिग्दर्शनचं नव्हे तर सहनिर्मितीची धुरा ही राजेश मापुसकर सांभाळणार आहेत. तर या सिरिजची निर्मिती अबंडेंटिया एन्टरटेनमेंट करणार आहे.

एकंदर या प्रोजेक्टविषयी आपले विचार मांडताना राजेश मापुसकर म्हणाले,“ इतिहास मला मोहिनी घालतो. लगे रहो मुन्नाभाईच्या चित्रिकरणावेळी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहताना गांधींजींच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर पडत होतो. आज 12 वर्षांनी, गांधीहत्येवर वेब सिरिज बनवण्यासाठी विक्रम मल्होत्राने मला विचारणा केली आणि मी लगेचच होकार कळवला. यानिमित्ताने दुसरी बाजू समजून घेण्याची संधी मिळाल्याचा मला नक्कीच आनंद आहे. नाण्याची ही दुसरी बाजू मी योग्यरित्या प्रेक्षकांसमोर मांडू शकेन, अशी आशा आहे.”

व्हेंटिलेटर सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि तीन फिल्मफेअर पुरस्कारांचे मानकरी ठरलेले राजेश मापुसकर आता डिजीटल विश्वातही पाऊल टाकत आहेत.

Web Title: rajesh mapuskar director web series mahatma gandhi esakal news