ट्विटरवर एकच ट्रेंड #44YearsOfRajinismManiaBegins

टीम ई-सकाळ
रविवार, 11 ऑगस्ट 2019

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटातील कारकिर्दीला तब्बल 44 वर्षे होत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

पुणे : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटातील कारकिर्दीला तब्बल 44 वर्षे होत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. तसेच ट्विटवर सध्या #44YearsOfRajinismManiaBegins ट्रेंड सुरु आहे. 

ट्विटरवर अनेकांकडून त्यांना शुभेच्छा देणारे ट्विट सध्या केले जात आहे. त्यासंदर्भात जवळपास दोन मिनिटांत 50 हजारांहून अधिक ट्विट केले जात आहे. तसेच आता टार्गेट 75 हजार आहे, असे ट्विटही करण्यात आले आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajinikanth Film Entry Tweets are Trending on Twitter