ब्रेकिंग- अभिनेते रजनीकांत हैद्राबादमधील हॉस्पिटलमध्ये दाखल

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 25 December 2020

उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांनंतर त्यांना तातडीने हॉस्पिटमध्ये हलवण्यात आलं आहे

मुंबई- अभिनेते रजनीकांत यांना हैद्राबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांनंतर त्यांना तातडीने हॉस्पिटमध्ये हलवण्यात आलं आहे जिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नुकतंच रजनीकांच यांच्या 'अन्नाथे' या सिनेमाचं हैद्राबादमधील रामोजी फिल्म सिटीमधील शूटींग थांबवण्यात आलं होतं.

हे ही वाचा: रजनीकांत यांच्या 'अन्नाथे' सिनेमाच्या टीममधील ४ सदस्य कोरोना पॉझिटीव्ह, शूटींगला लागला ब्रेक

या सिनेमाच्या टीममधील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी सिनेमाच्या प्रोडक्शन हाऊस यांनी ट्विट करत दिली होती. यानंतर रजनीकांत आणि सिनेमाच्या टीममधील इतर सदस्यांनी कोरोनाची टेस्ट केली असता ती निगेटीव्ह आल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र यानंतर रजनीकांत यांनी स्वतःला घरात क्वारंटाऊन केलं होतं. काही वेळापूर्वी त्यांचा रक्तदाबामध्ये अचानक चढ-उतार झाल्यांने त्यांना लगेचच उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.  

हैद्राबादमधील अपोलो हॉस्पिटलच्या वतीने अधिकृत स्टेटमेंट जाहीर करण्यात आलं आहे. हॉस्पिटलच्या स्टेटमेंटनुसार, 'रजनीकांत गेल्या १० दिवसांपासून हैद्राबादमध्ये सिनेमाचं शूट करत होते. या सेटवरील काही सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. त्यानंतर रजनीकांत यांनी २२ डिसेबंरला कोरोनाची टेस्ट केली जी निगेटीव्ह आली. तेव्हापासून त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केलं होतं. त्यांना कोणत्याही प्रकारची कोविड-१९ची लक्षणं नाही आहेत. त्यांच्या रक्तदाबामध्ये चढउतार झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांचा रक्तदाब सामान्य झाल्यानंतरच त्यांना हॉस्पिटमधून डिस्चार्ज देण्यात येईल तोपर्यंत डॉक्टरांची टीम त्यांच्यावर देखरेख ठेवेल. रक्तदाबाच्या चढ-उताराव्यतिरिक्त त्यांना कोणत्याची इतर आजाराची लक्षणं नाहीत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे.'  असं स्टेटमेंट हॉस्पिटलकडून जाहीर करण्यात आलं आहे.  

rajinikanth has been admitted to apollo hospital in hyderabad due to high blood pressure  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajinikanth has been admitted to apollo hospital in hyderabad due to high blood pressure