coronavirus: कामगारांच्या मदतीसाठी धावून आले रजनीकांत..एवढी मोठी रक्कम केली दान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून सुपरस्टार रजनीकांत कामगारांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत..रजनीकांत यांनी कामगारांसाठी मोठी रक्कम दान केली आहे..

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून सुपरस्टार रजनीकांत कामगारांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत..रजनीकांत यांनी कामगारांसाठी मोठी रक्कम दान केली आहे..रजनीकांत यांनी फिल्म फेडरेशन ऑफ साऊथ इंडिया युनियन वर्कर्सना ५० लाख एवढी रक्कम दान केली आहे...

हे ही वाचा: सेल्फ आयसोलेशनमुळे कतरिना-कार्तिकवर आली भांडी घासायची वेळ

देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून या संकटापासून बचावासाठी सिनेमा आणि टीव्ही मालिकांचं शूटींग बंद ठेवण्यात आलं आहे..त्यामुळे दररोजच्या दिवसावर काम करणारे कामगार संकटात सापडले आहेत...दररोजच्या कमाईवर पोट असणा-या या कामगारांना त्यांचा संसार चालवणं कठीण होऊन बसलंय..आणि म्हणूनंच रजनीकांत यांनी एक पाऊल पुढे टाकत मदतत म्हणून या कामगारांना ही रक्कम दान केली आहे..

गेल्या काही दिवसांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांना आवाहन केलं होतं, 'आपण सगळेजणच संकटात सापडलो आहोत तेव्हा या संकटात सगळ्यांनी पुढाकार घेऊन आपल्यापेक्षा खालच्या कामगारांचा विचार करुन त्यांची मदत करा..मोदी यांनी असं देखील म्हटं होतं की लोकांनी आपल्या नोकरदार वर्गाचा पगार कापू नका आणि शक्य असल्यास या काळात गरजूंना जमेल तशी मदत करा' आता जेव्हा सुपरस्टार रजनीकांत यांनी याची सुरुवात केली आहे तर असं म्हटलं जातंय की येत्या काही दिवसांत अनेक नामवंत चेहरे या परिस्थितीच समोर येऊ शकतात..

Image result for rajnikant help workers

जगभरात या कोरोना व्हायरसमुळे १६ हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यु झाला आहे..लाखोंच्या संख्येत या व्हायरसमुळे लोक संसर्गबाधित झाले आहेत..तर दुसरीकडे भारतात आत्तापर्यंत १० लोकांचा मृत्यु झाला आहे..आणि ५०० पेक्षा जास्त लोक कोरोनाबाधित आहे..आकडेवारीनुसार महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वात जास्त आहे..

rajinikanth has donated rs 50 lakhs to film employees federation of south india union workers  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajinikanth has donated rs 50 lakhs to film employees federation of south india union workers