Rajinikanth Movie : थलायवानं केली 170 व्या चित्रपटाची घोषणा, 'हा चित्रपट माझा आतापर्यतचा सर्वाधिक....'!

केवळ भारतच नाहीतर जगाच्या पाठीवर ज्यांच्या चित्रपटाचे चाहते आहेत त्या थलायवा उर्फ रजनीकांत यांच्या अभिनयाची बातच काही और आहे.
My 170th film will be a huge entertainer
My 170th film will be a huge entertaineresakal

My 170th film will be a huge entertainer : केवळ भारतच नाहीतर जगाच्या पाठीवर ज्यांच्या चित्रपटाचे चाहते आहेत त्या थलायवा उर्फ रजनीकांत यांच्या अभिनयाची बातच काही और आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा जेलर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये त्यांनी केलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनी जोरदार स्वागत केले होते. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

बॉक्स ऑफिसवर रजनीकांत यांच्या जेलरनं पाचशे कोटींपेक्षा अधिक कमाई करुन सनीच्या गदर २ ला मोठी टक्कर दिली होती. त्यानंतर आता रजनी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन १७० व्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ती पोस्ट करताना त्यांनी त्याविषयी मोजक्या शब्दांत भावनाही व्यक्त केल्या आहेत. ते काय म्हणालेत हे आपण जाणून घेणार आहोत.

Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत रजनीकांत यांचा क्रमांक नेहमीच पहिला राहिला आहे.त्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन आणि मग किंग खान शाहरुख. या तीनही कलाकारांनी आपआपला चाहतावर्ग तयार केला आहे. त्यांच्या चाहत्यांची वेगळी पसंती आहे. बिग बी यांची स्टाईल वेगळी आहे. वयाची ८० वर्षे पूर्ण केल्यानंतर देखील बिग बी एखाद्या तरुण कलाकारासारखे कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.

यासगळयात प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी १७० व्या चित्रपटाची घोषणा करणे हे त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे. रजनी यांचा प्रत्येक चित्रपट हा त्यांच्या चाहत्यांसाठी आनंद सोहळा असतो. एखादा सण असल्यासारखे त्या चित्रपटाचे स्वागत केले जाते. रजनी यांच्या फोटोंवर दुधाचा अभिषेकही केला जातो. भारतात क्वचितच एखाद्या अभिनेत्याच्या वाट्याला एवढं प्रेम आलं असेल.

जय भीम या चित्रपटाचे दिग्दर्शक टी जे ज्ञानवेल हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्याची निर्मिती लायका प्रॉडक्शनकडून केली जाणार आहे. रजनी यांनी त्यांच्या एका पोस्टमधून याविषयी चाहत्यांना माहिती दिली असून आपला हा १७० वा चित्रपट आतापर्यतचा सर्वाधिक इंटरटेनर मुव्ही असणार आहे. अद्याप या चित्रपटाचे नामकरण झालेले नाही.

My 170th film will be a huge entertainer
Shah Rukh Khan : 'विराट कोहली जावई आहे आपला'! किंग खान असं का म्हणाला?

रजनीकांत हे आता ७२ वर्षांचे असून गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या नावाची वेगळी ओळख दाक्षिणात्य चित्रपट विश्वावर कायम ठेवली आहे. आज ते भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले गेले आहेत. मी माझा १७० व्या चित्रपटाची घोषणा करत असून त्याचे नाव अद्याप ठरलेले नाही. असेही रजनी यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com