मुंबई, : कोरोना विषाणूने भारतात पसरत चालला आहे. एखाद्या परिसरात कोरोना विषाणूचा रूग्ण सापडला की लगेचच खबरदारी म्हणून तो परिसर सील करण्यात येत आहे. आता अभिनेता राजकुमार राव आणि विकी कौशल यांची इमारत सील करण्यात आली आहे. कारण त्यांच्या इमारतीमधील एका अकरा वर्षीय लहान मुलीला कोरोना झाल्याने त्यांच्या इमारतीचा काही भाग सील करण्यात आला आहे.
राजकुमार राव आणि विकी कौशल हे दोघेही अंधेरी येथील 'ऑबेरॉय स्प्रिंग्स' या इमारतीत राहतात. त्यांच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या एका ११ वर्षीय लहान मुलीला कोरोना विषाणूची लागण झाली असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या इमारतीचा काही भाग सील केला आहे. यानंतर आता या संपूर्ण इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
'ऑबेरॉय स्प्रिंग्स' या इमारतीमधील 'सी' विंगमध्ये एक डॉक्टर कुटुंब राहते. त्यांच्या ११ वर्षांच्या मुलीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. हे डॉक्टर कुटुंबीय 'ऑबेरॉय स्प्रिंग्स' इमारतीतील सी विंगमध्ये राहतात. त्यामुळे या इमारतीची 'सी' विंग पूर्णपणे सील करण्यात आली असून 'ए' आणि 'बी' विंगचा काही भागही सील करण्यात आला आहे. या इमारतीत विकी आणि राजकुमार राव याच्याशिवाय अभिनेत्री चित्रांगदा सिंह, मुग्धा गोडसे, अभिनेता अर्जन बाजवा, नील नितीन मुकेश, नृत्यदिग्दर्शक अहमद खान, प्रभू देवा, दिग्दर्शक आनंद एल राय, अभिनेता कृष्णा अभिषेक आणि कश्मिरा शाह आदी कलाकार राहतात.
अभिनेता अर्जन बाजवाने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, 'इमारतीतील सर्वच जण लिफ्टपर्यंत जाणे देखील टाळत आहेत. या इमारतीतील कुणीही घराबाहेर पडत नाही. सगळे जण घरीच लाॅकडाऊन आहेत. सी विंगमध्ये अर्जनसोबत चित्रगंदा सिंह, प्रभू देवा, चाहत खन्ना, राहुल देव, मुग्धा गोडसे आणि विपुल शाह राहतात. विशेष म्हणजे या इमारतीत निर्माते व दिग्दर्शक तसेच कलाकार राहतात.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.