'या' दिग्गज अभिनेत्याने नाकारली नथुराम गाेडसेची भूमिका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

राजकुमार संतोषी यांनी राजकुमारला नथुराम गोडसेची भूमिका ऑफर केली होती. मात्र राजकुमार करिअरच्या या स्टेजवर नकारात्मक भूमिका करू इच्छित नाही.

मुंबई : निवडक चित्रपटात काम करून नावारुपाला आलेला अभिनेता म्हणजे राजकुमार राव होय. त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सिलेक्टेड भूमिका साकारण्यासाठी ओळखले जाते. 

पण सध्या तो खुपच निवडक भूमिका साकारत आहे. याचे कारण 'स्त्री' चित्रपटानंतर रिलीज झालेल्या त्याच्या सहामधील पाच चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. त्यामुळे त्याने राजकुमार संतोषी यांनी ऑफर केलेल्या 'गांधी वर्सेस गोडसे'मध्ये काम करण्यास नकार दिला आहे.

खरं तर संतोषी यांनी राजकुमारला नथुराम गोडसेची भूमिका ऑफर केली होती. मात्र राजकुमार करिअरच्या या स्टेजवर नकारात्मक भूमिका करू इच्छित नाही.

Image result for rajkumar rao backside hd images

गोडसेेची भूमिका का नाकारली : राजकुमारने नुकतेच 'जजमेंटल है क्या'मध्ये सायको किलरची भूमिका केली होती. ती त्याच्या चाहत्यांना आवडली नाही. त्यामुळे राजकुमारने संतोषी यांना नकार िदला असावा. दुसरे कारण असे की, गोडसेेविषयी राजकुमारने आपले मत अजून व्यक्त केले नाही. राजकीयदृष्ट्या पाहिले तर गोडसेला उजव्या विचारसरणीने नेहमी नायक आणि डाव्या विचारसरणीने खलनायक म्हटले आहे. दुसरीकडे राजकुमारने कधीच आपली राजकीय विचारसरणी सांगितली नाही.

'तानाजी'ने बॉक्स ऑफिसवरही फडकावला झेंडा; पहिल्याच दिवशी 'एवढी' कमाई

Related image

नसीरुद्दीनसोबत सुरू आहे चर्चा : विशेष म्हणजे असगर वजाहतचे नाटक 'गोडसे@गांधी.कॉम' वर आधारित आहे. या चित्रपटासाठी संताेषी यांना गांधींच्या भूमिकेसाठी कलाकारदेखील मिळाले नाहीत. याच्या मागचे कारण अजून कळाले नाही. यासाठी नसीरुद्दीन शाह यांना विचारणा करण्यात आली आहे. नसीर यांच्याकडून अजून फायनल कॉल आला नाही. त्यांच्या जवळच्या मित्रानुसार, नसीरला ही भूमिका करायला आवडेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ते संतोषीच्या या चित्रपटात काम करण्यासाठी होकार देऊ शकतात. संतोषी या चित्रपटाची निर्मितीदेखील करणार आहेत. ते या चित्रपटाचा मुहूर्त शॉट गांधीजींचा बलिदान दिवस 30 जानेवारीच्या दिवशी शूट करू शकतात. यापूर्वी गांधीजींच्या भूमिकेसाठी संतोषीने 'लगे रहो मुन्ना भाई' फेम दिलीप प्रभावळकरसोबत चर्चा केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajkumar refused to play nathuram godse in gandhi verses godse