देहविक्री आणि मानवी तस्करीची दाहकता दाखवणारा 'लव्ह सोनिया'; ट्रेलर रिलीज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मानवी तस्करी, देहव्यापार आणि यातून होणारी निष्पाप मुलींची होरपळ या सर्व परिस्थितीची दाहकता दिग्दर्शकाने 'लव्ह सोनिया'मध्ये मांडली आहे. दुष्काळात हाल होणाऱ्या मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबातील दोन बहिणींचा वेदनादायक प्रवास मुंबई, बँकॉक आणि अमेरिकेतील लास वेगासपर्यंत होतो.

वेश्या व्यवसायातील वेदनांना मांडणारा 'लव्ह सोनिया' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. काल (ता. 23 ऑगस्ट, बुधवार) सोशल मिडीयावर सिनेमातील महत्त्वाच्या भूमिकांचे पोस्टर व्हायरल झाले होते. सिनेमाचे दिग्दर्शन तरबेज नुरानी यांनी केले आहे. 

love sonia

मानवी तस्करी, देहव्यापार आणि यातून होणारी निष्पाप मुलींची होरपळ या सर्व परिस्थितीची दाहकता दिग्दर्शकाने 'लव्ह सोनिया'मध्ये मांडली आहे. दुष्काळात हाल होणाऱ्या मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबातील दोन बहिणींचा वेदनादायक प्रवास मुंबई, बँकॉक आणि अमेरिकेतील लास वेगासपर्यंत होतो. वेश्या व्यवसाय हा केवळ छोट्या शहरांचाच भाग नाही, तर देशातील आणि परदेशातील मोठ्या शहरांतही देहव्यापार आणि मानवी तस्करीची भीषण परिस्थिती सिनेमात दाखवली आहे. 

सिनेमातील 'सोनिया' हे मुख्य पात्र मृणाल ठाकूर हिने साकारले आहे. शिवाय सिनेमात मनोज वाजपेयी, राजकुमार राव, रिचा चड्डा, अनुपम खेर, सई ताम्हणकर, फ्रिडा पिंटो, डेमी मूर, रिया सिसोदिया, आदिल हुसैन आणि सनी पवार यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. 

love sonia

'लव्ह सोनिया' येत्या 14 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajkummar Rao Anupam Kher Richa Chadda Mrunal Thakur Starrer Love Sonia Trailer Release