बर्थ डे स्पेशल: राजकुमार रावकडे फी भरण्यासाठी २ वर्ष नव्हते पैसे, खिशात केवळ होते १८ रुपये

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 31 August 2020

राजकुमार रावला बॉलीवूडमध्ये 'रण', 'लव सेक्स और धोका', 'रागिनी एमएमएस' सारख्या सिनेमातून ब्रेक मिळाला मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती 'काई पो छे' सिनेमातून.

मुंबई- 'अलीगढ', 'शाहिद', 'बरेली की बर्फी', 'स्त्री', 'न्युटन'सारख्या सिनेमांतून बॉलीवूडमध्ये स्वतःची जागा निर्माण करणारा अभिनेता राजकुमार रावचा आज वाढदिवस. राजकुमारचा जन्म ३१ ऑगस्ट १९८४ रोजी गुडगांवमधील अहीरवालमध्ये झाला. दिल्ली विश्वविद्यालयातील आत्माराम सनातन धर्म कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केल्यानंतर भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थानमधून शिक्षण पूर्ण केलं आणि त्याचं नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आला.  

हे ही वाचा: अभिनेता अभिजीत केळकर, रोहित राऊत, जुईली जोगळेकर यांना कोरोनाची लागण, 'सिंगिग स्टार'च्या सेटवर एकूण ६ जणांना लागण झाल्याने शूट थांबवलं​

राजकुमार रावला बॉलीवूडमध्ये 'रण', 'लव सेक्स और धोका', 'रागिनी एमएमएस' सारख्या सिनेमातून ब्रेक मिळाला मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती 'काई पो छे' सिनेमातून. फिल्मी करिअरच्या सुरुवातीला जेव्हा राजकुमारला यश मिळालं नाही तेव्हा त्याने आईच्या सांगण्यावरुन त्याच्या नावातील स्पेलिंग बदलली होती आणि Rajkumar Rao च्या जागी Rajkummar Rao लिहायला लागला. मात्र त्याचं खर नाव राजकुमार यादव असं आहे.

राजकुमारला त्याची प्रत्येक भूमिका जीव ओतून करण्याची सवय आहे. 'शाहीद' सिनेमात त्याने वकिल शाहीद आजमीची भूमिका केली होती ज्यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं.राजकुमार रावला हे यश अगदी सहज मिळालं नाही. त्याने ते दिवस देखील पाहिले जेव्हा त्याच्याकडे पैसे नव्हते. एका मुलाखतीत राजकुमारने म्हटलं होतं मी माझ्या हिस्स्यामधील ७ हजार रुपये द्यायचो जे माझ्यासाठी खूप जास्त होते. दर महिन्याला १५ ते २० हजार रुपयांची गरज असायची. एकदा तर माझ्या खात्यामध्ये केवळ १८ रुपये होते आणि माझ्या मित्राच्या खात्यात २३ रुपये.

राजकुमारने हे देखील सांगितलं होतं की आर्थिक अडचणींमुळे त्याच्या सरांनी दोन वर्षांपर्यंत त्याची फी भरली होती. तो मुंबईत आल्यावर त्याच्या मित्राच्या बाईकवरुन ऑडिशन द्यायला जायचा. त्याला चांगलं दिसण्यासाठी कसं राहिलं पाहिजे हे देखील माहित नव्हतं. या सगळ्या गोष्टींचा विचार न करता तो चेह-याला गुलाबपाणी लावायचा कारण त्याला वाटायचं तो यामुळे चांगला दिसेल.   

rajkummar rao birthday special some unknown and interesting facts about his life  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajkummar rao birthday special some unknown and interesting facts about his life