Happy Birthday Rajnikant ; गायकवाड होता 'रजनीकांत' झाला

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 12 December 2020

फार कमी कलाकारांना रजनीकांत एवढी प्रसिध्दी मिळते असे सांगावे लागेल. दक्षिणेत तर त्याला देवा सारखे पूजले जाते.

मुंबई -  जगात काही व्यक्तिमत्वं अशी असतात की त्यांना भाषा, प्रांत, सीमा, धर्म, या कशाचेही बंधन नसते. ती ख-या अर्थानं लोकप्रिय असतात. त्यांच्या कलेवर मनापासून प्रेम करणारे चाहते असतात. त्यांचं प्रेम त्यांना मिळतं आणि ते मोठे होतात. असाच एक कलाकार खरं तर महाराष्ट्राच्या मातीतला. मात्र कामाच्या निमित्तानं दक्षिण राज्यात गेला आणि तिकडचाच झाला. आता तो त्यांचा आहे असं म्हटलं तर ते चूकीचे ठरेल. तो सा-या जगाचा आहे. हे सांगावे लागेल.

फार कमी कलाकारांना रजनीकांत एवढी प्रसिध्दी मिळते असे सांगावे लागेल. दक्षिणेत तर त्याला देवा सारखे पूजले जाते. त्यांचा कुठलाही चित्रपट प्रदर्शित होणार असल्यास थिएटरच्या बाहेरचा माहोल पाहण्यासारखा असतो. त्याची बात काही औरच असते. आज रजनीकांतचा वाढदिवस. त्यानिमित्तानं त्याच्याविषयीच्या मनोरंजक गोष्टी खास रजनीच्या चाहत्यांसाठी

Rajnikant welcome to join Congress, says Rahul - Rediff.com India News

1. भारतीय सिनेमा जगतात सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांमध्ये रजनीकांतचा क्रमांक वरचा आहे. त्याचा फॅन फॉलोअर्सही प्रचंड मोठा आहे. देवासारखा मान त्याला दक्षिणेकडील राज्यांमध्ये दिला जातो. रजनीकांत यांना भारतीय चित्रपट क्षेत्राला दिलेल्या योगदानाबद्दल पदमश्री पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आले आहे.

Rajini clarifies on COVID-19 message, Twitter thanks him - DTNext.in

2. केवळ अभिनय नाही तर निर्माता, दिग्दर्शन, लेखन यासारख्या भूमिकेतही त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी काही चित्रपटांसाठी गायनही केलं आहे. कर्नाटकातल्या गायकवाड नावाच्या एका मराठी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचं गाव नचिकु्प्पम हे आहे. जे कृष्णागिरी या जिल्हयात येते.

Quiz: How well do you know Superstar Rajnikanth? - Rediff.com Movies

3.  रजनीकांत यांच्या वडिलांचे नाव रामोजीराव  असे होते तर आईचे नाव जिजाबाई. त्यांचे वडिल पोलीस सेवेत कामाला होते. वयाच्या आठव्या वर्षी त्यांना मातृशोक झाला. त्यांचे शालेय शिक्षण बंगलोर येथील आचार्य पाठशाळा येथे झाले. त्यांनी विवेकानंत बालक संघ याठिकाणीही शिक्षण घेतले.

Rajnikant To Play Double Role In His Next Untitled | Bolly Kingdom

4.  वाय.जी. महेंद्रन यांच्या बहिणीशी त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचे नाव लता पार्थसारथी. वयाच्या 31 व्या वर्षी तिरुपती येथे त्यांचे लग्न झाले. रजनीकांत यांना दोन मुली आहेत. ज्यांची नावे ऐश्वर्या आणि सौंदर्या अशी आहेत.

Rajnikant Blockbuster Tamil Dubbed Movie | South Indian Movies Dubbed In  Hindi 2019 New - YouTube

5.  1973 साली मद्रास येथील फिल्म संस्थेत ते जॉईन झाले होते. त्याकामी त्यांना राज बहादूर यांनी मदत केली होती. त्यावेळी त्यांनी अॅक्टिंगचा बेसिक कोर्सही केला होता. 

Darbar: Strictly for Rajnikant fans only

6. रजनीकांत यांनी आतापर्यंत एकूण 190 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात तमिळ, कन्नड, तेलगु, मल्याळम, हिंदी, इंग्रजी काही बंगाली चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी अंधाकानून चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. 

Rajnikant Jokes - Biakmuan Blog

7.  त्यांनी मोजक्याच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातील श्रीदेवी बरोबरील चालबाज, उत्तर दक्षिण, गिराफ्तार, हम या चित्रपटांचा समावेश आहे. 1988 प्रदर्शित झालेल्या ब्लडस्टोन चित्रपटातून त्यांनी हॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

Rajnikant Bot (@RajniHICkant) | Twitter

8.  रजनीकांत यांचा पहिला चित्रपट हा तमिळ भाषेत प्रदर्शित झाला होता. त्यात त्यांना एक सहाय्यक कलावंतांची भूमिका मिळाली होती. त्यानंतर अपूर्वा हा 1975 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांना कर्करोग झालेल्या रुग्णाची भूमिका केली होती. त्याचे दिग्दर्शक के.बालचंदर होते.

Happy Birthday Rajinikanth: 30 Rare & Candid Photos of Thalaivar -  Photogallery

9. बालचंदर हे रजनीकांत .यांचे गुरु असल्याचे म्हटले जाते. कथा संगमा हा त्यांचा पहिला कन्नड चित्रपटात भूमिका केली आहे. पुत्ताना कांगाल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Why is rajnikanth considered so great? - Quora

10. बालचंद यांनी ख-या अर्थानं रजनीकांत यांच्या भूमिकेला वेगवेगळे पैलू पाडण्याचे काम केले. रजनीकांत यांना ग्लॅमर मिळवून देण्यात त्यांचे योगदान महत्वाचे आहे.  आज सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनावर रजनीकांत यांची जी प्रतिमा आहे त्यात बालचंदर यांचा वाटा मोलाचा आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajnikant the greatest actor in indian cinema celebrating birthday 70 years