Raju Srivastav : राजूवर गुरुवारी होणार अंत्यसंस्कार; पार्थिव काही वेळात कुटुंबीयांना देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Srivastav Funeral News

Raju Srivastav : राजूवर गुरुवारी अंत्यसंस्कार; पार्थिव काही वेळात कुटुंबीयांना देणार

Raju Srivastav Funeral News प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांचे आज रुग्‍णालयात निधन झाले. राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्टला जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, आज लोकांना हसवणारा राजू श्रीवास्तव सर्वांना रडवून गेला. त्यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार (Funeral) होणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून प्राप्त झाली आहे.

राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav) यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले. ४२ दिवस रुग्णालयात जीवन-मरणाशी झुंज देत होते. त्यांनी २१ सप्टेंबर रोजी सकाळी १०.२० वाजता अखेरचा श्वास घेतला. १० ऑगस्ट रोजी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून ते व्हेंटिलेटरवर होते. दरम्यान, त्यांच्या शरीरात थोडीशी हालचाल झाली. परंतु, शुद्ध आले नाही.

हेही वाचा: Raju Srivastav : राजू श्रीवास्तवची नेट वर्थ ते दाऊद इब्राहिमकडून धमकी; काही खास गोष्टी

राजू लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी कुटुंबीय पूजाअर्चा करीत होते. चाहत्यांनीही त्यांच्यासाठी पार्थना केली. परंतु, देवाला काही वेगळेच मान्य होते. विनोदवीराच्या जाण्याने सर्वत्र शोकाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण दुःख व्यक्त करीत आहे. त्यांचे जुने कॉमेडी व्हिडिओ चाहते पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनुपम खेरपर्यंत सर्वांनी शोक व्यक्त केला आहे.

राजू श्रीवास्तव यांच्यावर गुरुवारी (ता. २२) दिल्लीतील द्वारका येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. बुधवारी दुपारी त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. राजू यांचे पार्थिव एम्समधून दशरथपुरी येथे काही वेळात नेण्यात येणार आहे. दशरथपुरीत राजू श्रीवास्तव यांच्या भावाचे घर आहे. तेथे अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे. यानंतर गुरुवारी द्वारकेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात येणार आहे.

हेही वाचा: Sunny Leone : सनी लिओनीने केला कहर; फोटोपाहून चाहते थक्क

भाऊ ४० दिवसांहून अधिक काळ लढला

‘मला कुटुंबाकडून फोन आला की राजू आता या जगात नाही. ही अत्यंत दुर्दैवी बातमी आहे. ४० दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते’ असे पीटीआयशी संवाद साधताना भाऊ दिपू श्रीवास्तव म्हणाले. राजू श्रीवास्तव यांना आधीपासून हृदयाशी संबंधित समस्या होत्या. मात्र, ज्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली त्या दिवशी ते सामान्य होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ते नेहमीप्रमाणे व्यायाम करीत होते.

Web Title: Raju Srivastav Funeral Thursday Comedian

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :funeralComedian