Rakesh Roshan: 'बाहुबली' आणि 'करण अर्जुन' सारखाच! राकेश रोशन यांचं अजब वक्तव्य|Rakesh Roshan Bollywood Director Birthday | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakesh Roshan News

Rakesh Roshan: 'बाहुबली' आणि 'करण अर्जुन' सारखाच! राकेश रोशन यांचं अजब वक्तव्य

Bollywood News: अभिनयापेक्षाही दिग्दर्शनामुळे जास्त लोकप्रिय झालेले अभिनेते म्हणून राकेश रोशन यांचे नाव घ्यावे लागेल. याशिवाय प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशनचे वडिल म्हणूनही त्यांची ओळख आहे. तुम्हाला ऋतिकचा कहो ना (Bollywood Movies) प्यार है आठवत असेल तर.. त्या चित्रपटातून त्यांनी त्याला ब्रेक देत बॉलीवूडला नवा सुपरस्टार मिळवून दिला होता. त्यानंतर त्यांच्या (Social Media viral News) वेगवेगळ्या चित्रपटातून ऋतिकनं बॉलीवूडमध्ये वेगळा ठसा उमटविल्याचे दिसून आले. आज राकेश रोशन यांचा जन्मदिवस. त्यानिमित्तानं त्यांनी एका मुलाखतीमध्ये सध्याच्या मनोरंजन विश्वातील घडामोडींवर भाष्य केले आहे.

राकेश रोशन यांनी बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूडच्या संघर्षावर बोट ठेवत काय परिस्थिती आहे याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वात नवा संघर्ष दिसून आला आहे. येत्या काळात बॉलीवूड निर्मात्यांना आपली दिशा आणि विचार करण्याची पद्धत बदलावी लागेल. असे सांगताना सध्या बॉलीवूडच्या निर्माते आणि दिग्दर्शक यांना काय झाले आहे असा प्रश्नही केला आहे. मी बऱ्याच दिवसांपासून काही गोष्टी बारकाईनं पाहत आहे त्या अशा की, टॉलीवूडमध्ये जे विषय हाताळले जात आहेत त्याला आपल्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

आजकाल तरुणांना म्हणा किंवा इतर कोणत्याही वयोगटातील प्रेक्षकांना हिरोइसमशी संबंधित चित्रपट पाहायला आवडतात. मात्र आपल्याकडे त्या चित्रपटांची उणीव आहे. टॉलीवूडमध्ये ते चित्रपट मोठ्या प्रमाणावर दिसतात. आपल्याकडे पुष्पा, आरआरआर, केजीएफ सारखा चित्रपट आहे का....याचे उत्तर काय आहे....तेच ते विषय आणि सपक मांडणी याला प्रेक्षक कंटाळला आहे. यात ओटीटीवर सतत आढळणारा कंटेट हा देखील प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणावर मनोरंजन करत असल्यानं आव्हानं वाढली आहेत.

टॉलीवूडमध्ये जसा आरआरआर किंवा केजीएफ आहे तसा आपल्याकडे करण अर्जुन चित्रपट आहेच की. मात्र आपल्याला त्याचा विसर पडला आहे. हिरोइझमशी संबंधित या चित्रपटांकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानं घोटाळा झाला आहे. त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर होताना दिसतो आहे. आपल्याकडे मोठे हिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकांची संख्या कमी होत आहे. त्यांच्याकडून पॅन इंडियासारखे प्रोजेक्टही होत नसल्याची खंत रोशन यांनी यावेळी व्यक्त केली आहे.